Kanpur Woman killed her husband saam tv
देश विदेश

Kanpur Crime : पुतण्याच्या प्रेमात आकंठ बुडाली काकी, नवऱ्याला संपवलं; निर्दयी बायकोच्या फोनमध्ये ५५ अश्लील व्हिडिओ

Kanpur Murder Case : उत्तर प्रदेशातील कानपूरच्या घाटमपूरमध्ये पुतण्याच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या काकीनं तिच्या नवऱ्याची निर्दयीपणे हत्या केली. पुतण्याच्या प्रेमात आंधळी झालेल्या रीनाच्या मोबाइलमध्ये ५५ अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. धक्कादायक म्हणजे तिच्या मोबाइलमध्ये अनेक फोन नंबर टोपण नावांनी सेव्ह केल्याचे उघड झाले आहे.

Nandkumar Joshi

मेरठमधील हत्याकांडाची घटना ताजी असतानाच, उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्येही महिलेने प्रियकराच्या मदतीने तिच्या नवऱ्याची निर्दयीपणे हत्या केली. या महिलेचा बॉयफ्रेंड हा तिचाच पुतण्या आहे. याच पुतण्यानं काकीसोबत कट रचून आपल्या काकाची हत्या केली. पोलीस तपासात या घटनेचे अनेक धागेदारे समोर आल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरमध्ये ही हादरवणारी घटना घडली आहे. पुतण्याच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या काकीने तिच्या नवऱ्याच्या हत्येचा कट रचला. नवऱ्याला तिने झोपेच्या गोळ्या खायला दिल्या. त्यानंतर प्रियकर असलेल्या पुतण्याच्या मदतीने नवऱ्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर लाकडानं प्रहार करून हत्या केली. त्यानंतर नवऱ्याची हत्या झाल्याचा बनाव रचला. पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला. गावातीलच तीन जणांवर तिने हत्येचा आरोप केला. पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांना कोठडीतही पाठवलं. मात्र, फॉरेन्सिक पथक आणि पोलीस तपासात एकेक धागा जुळत गेला आणि पुतण्या आणि काकीच्या कृत्याचा पर्दाफाश झाला.

साढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मणखेडा गावात धीरेंद्र हा शेतीचं काम करायचा. ११ मे रोजी त्याचा मृतदेह घराबाहेर असलेल्या खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. धीरेंद्र हा पत्नी रीना, चार वर्षांचा मुलगा आणि आईसोबत राहत होता. उसनवारीतून नवऱ्याची हत्या झाल्याचा आरोप पत्नी रीनानं केला होता. गावातीलच तीन जणांवर तिने आरोप केले. त्यांच्यातील वादाची माहिती पोलिसांना दिली होती. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असं सांगून तिने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

क्रूर बायकोचा कृत्य उघड

पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. धीरेंद्रची पत्नी रीना आणि पुतण्या सतीश यांचे प्रेमसंबंध असल्याचं स्पष्ट झालं. दोघांनी कट रचून धीरेंद्रची हत्या केल्याचे पुरावे हाती लागले आहेत. रीनाचे प्रेमसंबंध असल्याचे धीरेंद्रला समजले होते. पण सतीश हा मोठ्या भावाचाच मुलगा असल्याने काही करू शकला नाही. पत्नीवर पाळत ठेवता यावी म्हणून धीरेंद्रने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचीही तयारी केली होती. ते रीनाला समजले. तेव्हा तिने सतीशसोबत मिळून नवऱ्याचा प्रेमातील अडथळा कायमचा दूर केला.

कॉल डिटेल्स आले आणि भांड फुटलं

रीना हिने १० मेच्या रात्री नवऱ्याला झोपेच्या गोळ्या खायला दिल्या होत्या. त्यानंतर मध्यरात्री सतीशला घरी बोलावलं. लाकडाने डोक्यावर प्रहार करून नवऱ्याची हत्या केली. साढ पोलिसांनी मागील रविवारी दोघांना अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, रीनाच्या मोबाइल कॉल डिटेल्समधून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. रीना आणि सतीश यांच्यात दिवसातून ६० ते १०० वेळा कॉल झाल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे.

सतीशने खरेदी केले होते दोन सीमकार्ड

पोलीस चौकशीत अनेक खळबळजनक खुलासे झाले आहेत. सतीशने दोन सिमकार्ड खरेदी केले होते. त्यातील एक सिमकार्ड त्याने रीना आणि दुसरा सिमकार्ड त्याने स्वतःकडेच ठेवला होता. घटना घडली त्या रात्री दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी धीरेंद्रने गहू विकून २० हजार रुपये जमवले होते. पण त्याआधीच सतीश आणि रीनाने कट आखून धीरेंद्रला संपवले. रीनाने भाजीत झोपेच्या गोळ्या टाकून ती खाऊ घातली. त्यानंतर खूप उकडतं म्हणून तिने घराच्या मागे खाट टाकली. तिथेच ती धीरेंद्रसोबत गप्पा मारत होती. धीरेंद्रला झोप लागली. सासू आणि मुलाला खोलीत झोपायला सांगितलं. त्यानंतर रीनाने सतीशला घरी बोलावलं.

त्याने लाकडाचे प्रहार करून धीरेंद्रची हत्या केली. हत्येनंतर सगळीकडे रक्त पसरलं होतं. त्या दोघांनी अंगण आणि खोली स्वच्छ केली. हत्येनंतर सतीश त्याच्या घराबाहेर बागेत जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी धीरेंद्रचा मृतदेह बघून रीना जोरजोरात ओरडू लागली. तसेच रडण्याचं नाटक करू लागली. धक्कादायक म्हणजे दोघांनी महिनाभरापूर्वीच धीरेंद्रच्या हत्येचा कट रचला होता. गावातीलच एका तरूणाचा धीरेंद्रसोबत वाद झाला होता. त्याचाच फायदा उठवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. धीरेंद्रच्या हत्येचा आरोप तिने गावातीलच तिघांवर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Saiyara' तू तो बदला नहीं है... या ट्रेंडींग गाण्याचा अर्थ काय?

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

SCROLL FOR NEXT