Kanpur training aircraft explodes after takeoff and crashes near Ganga river Social media
देश विदेश

Kanpur Plane Crash: मोठी दुर्घटना! ट्रेनी विमान कोसळलं, पायलटचा मृत्यू; उड्डाण भरताच हवेतच मोठा स्फोट

Kanpur training aircraft crashes near Ganga river: कानपूरमध्ये ट्रेनी विमान कोसळून एका पायलटचा मृत्यू झाला. तर दुसरा पायलट गंभीर जखमी झाला आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ही दुर्घटना घडली.

Nandkumar Joshi

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये ट्रेनी विमान कोसळलं. विमानानं गुरुवारी दुपारी उड्डाण घेताच अचानक मोठा स्फोट झाला आणि नंतर ते विमान खाली कोसळलं. गंगा नदीकाठी नत्था पुरवा गावाजवळ भीषण स्फोट झाल्यानंतर हे विमान जमिनीवर कोसळलं. अपघात झाल्यानंतर मोठा आवाज झाल्यानं गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली.

प्राथमिक माहितीनुसार, हे विमान ट्विन-इंजिन (दोन इंजिन असलेले) होते. त्यात दोन पायलट होते, अशी माहिती आहे. उड्डाण केल्यानंतर अचानक विमानात स्फोट झाला. त्यानंतर विमान नियंत्रणाबाहेर गेले आणि ते खाली कोसळले. अपघातानंतर घटनास्थळी धूर पसरले होते. अपघातानंतर फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत, त्यानुसार, विमानाचे अवशेष जमिनीवर पडले आहेत.

या अपघातात एका पायलटचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा पायलट गंभीर जखमी झाला आहे. विमानाचे अवशेष बाजूला करून त्याला बाहेर काढण्यात आले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले. जखमी पायलटला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. विमान कोसळल्याची बातमी आसपासच्या गावांमध्ये वेगाने पसरली. पाहता पाहता घटनास्थळी मोठ्या संख्येने गावकऱ्यांची गर्दी झाली.

अपघात कसा झाला याचा तपास सुरू आहे. विमान कोणत्या कारणामुळे दुर्घटनाग्रस्त झाले, उड्डाणादरम्यान त्यात स्फोट का झाला आणि तांत्रिक बिघाड झाला का, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधली जात आहेत. अपघाताशी संबंधित माहिती आणि विमान दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: कॅबिनेटमध्ये मनोज जरांगेंविरोधात नाराजीचा सूर; भाजपचे मंत्री आक्रमक

Gokul Election: महायुतीत जागावाटपावरून फूट? गोकुळच्या मैदानात अमित शाह?

Mumbai News: नाल्यात टाकत होते कचरा, ड्राय वेस्ट वाहनाला पकडलं; BMC कडून ठेकेदाराला नोटीस

मोठी बातमी! शिंदे गटाच्या नेत्याला शिवसेनेच्या शाखेतच बांबूने मारहाण; धक्कादायक कारण आलं समोर

ind vs wi odi squad 2026 : भारतीय संघाची घोषणा; रोहित शर्मा, विराट कोहलीबाबत मोठा निर्णय, जडेजाचं कमबॅक

SCROLL FOR NEXT