काबुलमध्ये युक्रेनच्या विमानाचं अपहरण!; इराणकडे वळवल्याची सूत्रांची माहिती Saam Tv
देश विदेश

काबुलमध्ये युक्रेनच्या विमानाचं अपहरण!; इराणकडे वळवल्याची सूत्रांची माहिती

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने सत्ता हाती घेतल्यावर तेथील परिस्थिती चिघळत चाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : अफगाणिस्तानमध्ये Afghanistan तालिबानने सत्ता हाती घेतल्यावर तेथील परिस्थिती चिघळत चाली आहे. तालिबान Taliban आणि दहशतवाद Terrorism हे समीकरण असल्यामुळे अनेक देशांनी चिंता व्यक्त करत आहेत. आता अफगाणिस्तानात युक्रेनच्या Ukraine विमानाचे अपहरण Kidnapping केल्याचे समोर आले आहे. युक्रेनचे विमान Aircraft आपल्या नागरिकांना आणण्याकरिता अफगाणिस्तानात गेले होते.

हे देखील पहा-

या दरम्यान विमानाचे अपहरण झाल्याचा दावा युक्रेनच्या उप परराष्ट्रमंत्र्यांनी केला आहे. रशियाची वृत्तसंस्था TASS ने याबाबतचे महत्वाचे वृत्त दिले आहे. विमान हामिद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नागरिकांना घेण्याकरिता उतरले होते आणि त्याठिकाणाहून इराणसाठी उड्डाण केले होते. मागील रविवारी अज्ञात लोकांनी विमान अपहरण केले होते, असे युक्रेनचे परराष्ट्र मंत्री येवगेनी येसेनिन यांनी रशियन वृत्तसंस्था TASS ला सांगितले आहे.

युक्रेनियन लोकांबरोबर उड्डाण करण्याऐवजी, काही अज्ञात लोक त्यात चढले आणि इराणच्या दिशेने उड्डाण आहेत. यामुळे आमचे ३ एअरलिफ्टचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहे. आमचे लोक विमानतळावरच पोहोचू शकत नाहीत, असे त्यांनी पुढे सांगितले आहे. दुसरीकडे इराणने युक्रेनच्या दाव्याचे खंडन करण्यात आले आहे. युक्रेनचे विमान २३ ऑगस्टला मशहदमध्ये इंधन भरण्याकरिता थांबले होते. यानंतर युक्रेनला परतले आहे, असे स्पष्टीकरण इराणकडून देण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shadashtak Yog: सूर्य-गुरुची अशुभ दृष्टीमुळे ओढावणार 'या' राशींवर संकट; नात्यात टोकाचे वाद होण्याची शक्यता

Bank Job: १५०० रिक्त जागा अन् ८५००० रुपये पगार; यूनियन बँकेत भरती सुरु; अर्ज कसा करावा? जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: शिवसेना उमेदवार विजय शिवातारेंकडून आचारसंहितेचा भंग

Maharashtra Election : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं खिंडार, ९१ पदाधिकाऱ्यांनी सोडली साध, भाजपचा प्रचार करणार!

Winter Breakfast Ideas : हिवाळ्यात तुमची सकाळ होईल गोड; १० मिनिटात बनवा टेस्टी अन् हेल्दी ब्रेकफास्ट

SCROLL FOR NEXT