सुप्रीम मस्कर, साम टीव्ही
जम्मू-काश्मीर : पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या गद्दार ज्योती मल्होत्राचं आणखी एक नवं चॅट समोर आलंय. पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा अधिकारी अली हसन याच्या सोबतचे हे व्हॉट्सऍप चॅट आहे. यात ज्योतीनं 'पाकिस्तानात माझं लग्न करून द्या' अशी मागणी केलीय. गद्दार ज्योतीला पोलिसांनी थर्ड डिग्रीचा हिसका दाखवला आणि ज्योती पोपटासारखी बोलू लागलीय. पाकिस्तानातील दौऱ्यादरम्यान तिची भेट आयएसआय अधिकारी अली हसनशी झाली होती आणि त्यानेच ज्योतीला व्हीआयपी सुविधाही पुरवल्या होत्या. ज्योती आणि अली हसनच्या चॅटमध्ये नेमकं काय आहे पाहूयात.
ज्योतीला सोशल मीडियावर अजून प्रसिद्ध व्हायचं होतं आणि त्यासाठी तिची पाकिस्तानी युट्यूबर किंवा पाकमधील एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीसोबत लग्न करण्याची इच्छा होती. त्यातून अली हसन आणि ज्योती यांच्यात बोलणं व्हायचं. ज्योतीच्या चॅटमधील हसन अली नेमका कोण आहे पाहूया.
कोण आहे अली हसन ?
दानिशसारखा अली हसन पाकमधील ISI अधिकारी
हसन ज्योतीच्या राहण्याची आणि VIP प्रवासाची व्यवस्था करायचा
पाकमधून परतल्यानंतरही ज्योती हसनच्या सतत संपर्कात
हसनमुळे ज्योतीची शाकीर आणि राणा शाहबाजशी ओळख
ज्योतीनं स्वत: पाकिस्तानमधील अनेक लोकांशी सोशल मीडियावर चॅट करत असल्याचं कबूल केलयं. गद्दार ज्योतीनं संवेदनशील माहितीची देवाणघेवाण केल्याचा संशय आहे. त्यातच पाकिस्तानमधल्या एखादया अधिकाऱ्याशी लग्न करून पाकची 'बेगम' होण्याची ज्योतीची इच्छा तिच्या नापाक इराद्यांचीच साक्ष देते. त्यामुळे भारतात राहून पाकसाठी हेर करणाऱ्या गद्दार ज्योतीला आता चांगलाच धडा शिकवायला हवा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.