JPSC PAPER LEAK CASE: FORMER CHAIRMAN ARRESTED BY CID, STUDENT PROTESTS ERUPT saam tv
देश विदेश

पेपरफुटी प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई! JPSC च्या माजी अध्यक्षाला CID ने केली अटक; शिक्षणक्षेत्रात खळबळ

JPSC Paper Leak Case: झारखंडमधील JPSC पेपरफुटी प्रकरणात CID ची मोठी कारवाई; माजी अध्यक्ष एल. खियांग्ते अटकेत. आतापर्यंत 20 जणांना अटक, विद्यार्थ्यांचे आंदोलन तीव्र. ED कडूनही तपास सुरू.

Omkar Sonawane

झारखंडमध्ये विविध स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहाराविरोधात रांची येथे विद्यार्थ्यांनी विधानसभेला घेराव घातला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हेमंत सोरेन सरकारने मोठी कारवाई केली आहे. CID ने JPSC चे माजी अध्यक्ष एल.खियांग्ते यांना अटक केली आहे. या प्रकरणात CID ची ही 20 वी अटक असून याआधी उपपरीक्षा नियंत्रकासह 19 जणांना अटक करण्यात आली आहे.

JPSC चे अध्यक्ष एल खियांग्ते यांनी 22 जुलै रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. 28 जुलैपासून त्यांची अनेकदा चौकशी करण्यात आली होती. याच दरम्यान रविवारी झारखंड लोकसेवा आयोगाच्या तीन सदस्यांनीही राजीनामा दिला होता. राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी अजीता भट्टाचार्य, अनिमा हांस दा आणि जमाल अहमद यांचे राजीनामे स्वीकारले. सीआयडीने जेपीएससीच्या तीन सदस्यांना अजीता भट्टाचार्य, अनिमा हांसदा आणि जमाल अहमद पेपरफुटी आणि इतर गैरप्रकारांच्या आरोपांवरून चौकशीसाठी बोलावले होते. या तिघांची नियुक्ती सप्टेंबर 2021 मध्ये झाली होती. परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांविरोधात आंदोलक सीबीआय चौकशीच्या मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, या प्रकरणात ईडीचीही एन्ट्री झाली असून तपास सुरू करण्यात आला आहे.

प्रकरणात ईडीचा तपास सुरू

ईडीने जेएसएससी-सीजीएल परीक्षेसह झारखंडमधील इतर भरती परीक्षांमधील कथित गैरव्यवहारांशी संबंधित आर्थिक गुन्ह्यांची चौकशी सुरू केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआयडीने दाखल केलेल्या एफआयआरसह इतर तक्रारींचाही ईडीने विचार केला आहे. धनशोधन प्रतिबंधक कायद्यांतर्गत (PMLA) या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

दरम्यान, विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी सोमवारी झारखंड विधानसभेवर मोर्चा काढला. आंदोलकांनी अनेक बॅरिकेड तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला आणि लाठीचार्जही केला. गेल्या 9 दिवसांपासून उपोषणावर असलेले झारखंड लोकतांत्रिक क्रांतिकारी मोर्चाचे नेते देवेंद्रनाथ महतो अॅम्ब्युलन्समधून मोर्चात सहभागी झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT