Joshimath  Saam Tv
देश विदेश

Uttarakhand News: रस्त्यांवर भेगा, घरांना तडे... उत्तराखंडमध्ये जमिनीखाली काय सुरुये? नागरिक चिंतेत

जोशीमठ येथील परिस्थिती एवढी बिकट आहे की केंद्र सरकार देखील लक्ष ठेवून आहे.

साम टिव्ही ब्युरो

जोशीमठ: उत्तराखंडमधील जोशीमठ येथील परिस्थिती सध्या चिंता वाढवणारी आहे. येथे जमिनीला अचानक भेगा पडल्या आहेत. शेकडो घरे, हॉटेल्स आणि इतर बिल्डिंगना देखील मोठे तडे गेले आहे. अचानक रहस्यमयरित्या घडामोडींमुळे नागरिकांची झोप उडाली आहे.

जोशीमठ येथील परिस्थिती एवढी बिकट आहे की केंद्र सरकार देखील लक्ष ठेवून आहे. रविवारी पंतप्रधान कार्यालयात या विषयावर महत्त्वपूर्ण बैठक झाली. पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ.पी.के. मिश्रा यांनी पीएमओमधील कॅबिनेट सचिव आणि भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सदस्यांसोबत जोशीमठमधील परिस्थितीबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली. उत्तराखंडमधील या मोठ्या आपत्तीबाबत पंतप्रधान कार्यालयाने बोलावलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत जोशीमठ जिल्ह्याचे अधिकारीही उपस्थित होते.

जमिनीला तडे गेल्याने जोशीमठचे रस्ते, घरे, कार्यालये, मैदाने, हॉटेल्स, शाळा आदी ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे या इमारती राहण्यासाठी असुरक्षित झाल्यात. जोशीमठातील सर्व विकास कामेही ठप्प झाली आहेत.

घरांना भेगा पडण्याच्या भीतीने लोकांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. दिवसेंदिवस भेगा रुंद होत आहेत. महिनाभरापासून ही संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे, मात्र त्यानंतर प्रशासनाने कोणतीही हालचाल केली नाही. आता अचानक रेड क्रॉस लावून लोकांना घराबाहेर पडण्यास सांगितले जात आहे. लोकांकडे सामान हलवण्याचे साधन नाही. राहायला जागा नाही. त्यांना किती काळ मदत छावण्यांमध्ये राहावे लागणार आहे, हेही माहीत नाही. लोकांच्या मनात अनेक शंका आहेत, त्या प्रशासनाने दूर कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.

राज्य सरकारने तात्काळ प्रभावाने लोकांना स्थलांतरित केले आहे. त्यांची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे ज्यात अन्न, पाणी, औषध, डॉक्टर आणि सर्व सुविधा आहेत. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात बैठक घेऊन अनेक मोठे निर्णय घेतले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून बसपाचे संस्थापक कांशीराम यांना मरणोत्तर भारतरत्न देण्याची विनंती केली

Mens Health After 40: फक्त पुरुषांनाच होतात हे ४ जीवघेणे आजार, चाळिशीतल्या पुरुषांनी आत्ताच व्हा सावध

LPG Cylinder Blast : सिलिंडरच्या भीषण स्फोटात तीन घरे उध्वस्त, दोन लहान मुलांचा होरपळून मृत्यू, ७ जण गंभीर जखमी

Summer Makeup Tips: मेकअपसाठी 3-1-1 हा नियम नक्की काय आहे? जाणून घ्या परफेक्ट मेकअपचं सिक्रेट

Chandrika Dixit Controversy: 'मुलासाठी कुणासोबत झोपावं लागलं तरी…'; बिग बॉस फेम इन्फ्लुएंसरचं धक्कादायक वक्तव्य

SCROLL FOR NEXT