High Court on Hemant Soren Petition Saam TV
देश विदेश

Hemant Soren: हेमंत सोरेन यांना मोठा धक्का, हायकोर्टाने फेटाळली याचिका; फक्त 'या' गोष्टीला दिली परवानगी

High Court on Hemant Soren Petition: झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. सोरेन यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका झारखंड उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

Satish Daud

High Court Rejected Hemant Soren Petition

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. सोरेन यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका झारखंड उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे सोरेन आणखी काही दिवस तुरुंगातच राहणार आहेत. फक्त काकांच्या श्राद्धासाठी त्यांना एक दिवसापुरता जामीन मिळणार आहे.

त्यामुळे हेमंत सोरेन फक्त ६ मे रोजी एकाच दिवसासाठी तुरुंगातून बाहेर येणार असून पोलीस बंदोबस्तात ते आपल्या काकांच्या श्राद्धविधीला उपस्थित राहणार आहेत. श्राद्धविधीनंतर त्यांना पुन्हा तुरुंगात परतावे लागणार आहे. या काळात कोणत्याही माध्यमांसोबत बोलू नये, अशा सूचनाही त्यांना कोर्टाने केल्या आहेत.

कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने ३१ जानेवारीला हेमंत सोरेन यांना अटक केली होती. अटकेच्या काही तासांआधीच सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. अटकेनंतर ईडीने त्यांची रवानगी तुरुंगात केली. तेव्हापासून ते ईडीच्या कोठडीत आहेत.

दरम्यान, हेमंत सोरेन यांच्या वतीने अटक आणि ईडी रिमांडला आव्हान देणारी फौजदारी रिट याचिका दाखल करण्यात आली होती. यामध्ये हेमंत सोरेन यांच्या वतीने अटक आणि ईडी रिमांडला आव्हान देणारी फौजदारी रिट याचिका दाखल करण्यात आली होती.

या याचिकेवर न्यायालयाने २८ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेतली. दोन्ही पक्षाच्या बाजू ऐकल्यानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. शुक्रवारी (ता. ३) झारखंड उच्च न्यायालयाने निकाल जाहीर केला असून हेमंत सोरेन यांना अटकेपासून दिलासा देण्यास नकार दिला आहे.

त्यामुळे सोरेन यांना काही दिवस तुरुंगातच राहावं लागणार आहे. फक्त काकांच्या श्राद्धासाठी त्यांना कोर्टाने अटीशर्थीसह एका दिवसांचा जामीन दिला आहे. त्यामुळे ६ मे रोजी हेमंत सोरेन काकांच्या श्राद्धासाठी तुरुंगातून बाहेर येतील. कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी रवानगी पुन्हा तुरुंगात केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

Congress Leader Death : काँग्रेसच्या नेत्याची दिवसाढवळ्या हत्या, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Maharashtra Live News Update: - तुळजापूर डान्स प्रकरण : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडून दिलगिरी व्यक्त

धाराशिव दौऱ्यात संजय राऊतांनी खाल्ले काजू, बदाम; कुणी केला दावा? | VIDEO

Shocking News : तरूणीसोबत घडली विचित्र घटना, बाथरूममध्ये आंघोळीला गेली अन् कोपऱ्यातलं दृश्य बघून हादरलीच!

SCROLL FOR NEXT