Hemant Soren Makes Serious Allegations Against BJP Saam Tv
देश विदेश

Hemant Soren Allegations: माझ्या अटकेची स्क्रिप्ट आधीच लिहिली होती; राजभवनाचं नाव घेत हेमंत सोरेन यांचा गंभीर आरोप

Hemant Soren On BJP: झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. यादरम्यान माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सभागृहात भाषण करताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

Satish Kengar

Hemant Soren Makes Serious Allegations Against BJP:

झारखंडचे नवीन मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी सोमवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला आहे. यादरम्यान माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सभागृहात भाषण करताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला आणि त्यांच्या अटकेसाठी राजभवनलाही जबाबदार धरले.

यावेळी त्यांनी आपल्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असून मी निर्दोष आहे, असं म्हटलं आहे. सभागृहात भाषण करताना ते म्हणाले आहेत की, जर माझ्यावर लावलेले आरोप सिद्ध झाले तर, राजकारणासोबत झारखंडही सोडणार. आपल्या अटकेची स्क्रिप्ट अगोदरच लिहिली जात असून राजभवनचाही त्यात सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले.

हेमंत सोरेन म्हणाले, ''31 जानेवारीची रात्र ही देशातच्या लोकशाहीच्या इतिहासात काळी रात्र म्हणून लिहिली जाईल. माझ्या माहितीनुसार, देशात पहिल्यांदा एका मुख्यमंत्र्यांना 31 तारखेच्या रात्री अटक करण्यात आली आहे. ही घटना घडवण्यात राजभवनचाही कुठेतरी सहभाग आहे, असं मला वाटतं. ज्या पद्धतीने हे घडलं त्याचं मला आश्चर्य वाटतं.'' ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याशिवाय हेमंत सोरेन यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, ''भाजपचे लोक आदिवासींचा द्वेष करतात. जे जंगलात होते, त्यांनी जंगलातच राहिले पाहिजे, असे त्यांचे मत आहे. हे लोक आम्हाला अस्पृश्य मानतात आणि आम्ही अद्याप पराभव स्वीकारलेला नाही. तसेच आम्ही अश्रूही ढाळणार नाही. आम्ही आम्ही योग्य वेळेची वाट पाहत आहोत. त्यांच्या प्रत्येक कटाला उत्तर दिले जाईल.''

दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हेमंत सोरेन यांना गेल्या आठवड्यात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. यानंतर जेएमएम विधिमंडळ पक्षाचे नेते चंपाई सोरेन यांनी 2 फेब्रुवारी रोजी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हेमंत सोरेन म्हणाले की, ''मी भाजपला माझ्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करण्याचे आव्हान देतो. जर आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडेन.'' सोरेन सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांना विशेष पीएमएलए (प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट) न्यायालयाने विश्वासदर्शक ठरावात भाग घेण्याची परवानगी दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway News : ट्रेनमध्ये टॉयलेट असते, पण लोकल आणि मेट्रोमध्ये का नाही? वाचा नेमकं कारण

Salman Khan: कोट्यावधींचा मालक सलमान खान चित्रपटांशिवाय 'या' कामातून करतो बक्कळ कमाई

Maharashtra Live News Update: त्र्यंबकेश्वर मंदिरातील VIP दर्शनसेवा बंद

Biscuit Pudding Recipe: न्यू इयरसाठी घरच्या घरी तयार करा टेस्टी बिस्कीट पुडिंग, वाचा सोपी रेसिपी

Ladki Bahin Yojana: २ महिने संपले पण खात्यात पैसेच नाहीत, लाडक्या बहि‍णींच्या बँकेत चकरा,₹३००० कधी येणार?

SCROLL FOR NEXT