Jharkhand Election 
देश विदेश

Jharkhand Election: झारखंडात 'या' पाच नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; पराभूत झाले तर संपेल राजकारणातील करिअर

Jharkhand Assembly Election: झारखंडमध्येही महायुती आणि आघाडीत लढत होणार आहे. भाजपने निवड आजसू, जेडीयू, आणि लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) यासह झामुमोने काँग्रेस, आरजेडी आणि डाव्या पक्षांसह आघाडी केलीय.

Bharat Jadhav

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीत शिलेदारांना उतरवल्यानंतर भाजपमध्ये मोठी उलाढाल होतेय. अनेक बड्या नेत्यांनी पक्ष सोडलाय तर अनेक जागांवर बंडखोरांनी भाजपची चिंता वाढलीय. झारखंडमध्ये २०१९मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला होता. यामुळे मागे झालेल्या चुकांपासून शिकत भाजप यावेळी विजय साकारण्याचा प्रयत्न करणार आहे. भाजपने ऑल इंडिया स्टूडेंट्स युनियन (आजसू)सह युती केलीय. तर जेडीयू आणि लोक जनशक्ती यांना देखील आपल्या युतीत घेतलंय. झारखंडच्या विधानसभा निवडणुकीत पाच असे नेते आहेत, ज्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठा पणाला लावणारी ठरणार आहे.

हेमंत सोरेन

मुख्यमंत्री हेमंत सोरेन मनी लॉण्ड्रिग प्रकरणात ५ महिने तुरुंगवारी करून आलेत. दरम्यान हेमंत सोरेन यांनी विधानसभा निवडणुकीत सरकारच्या योजना, पेन्शन योजना, सेवांची डोअर स्टेप डिलीव्हरी , १८ ते ५० वर्षांच्या वंचित जमातीमधील महिलांसाठी मैया सन्मान योजनांचा मुद्दांवरून प्रचार सुरू केलाय. हेमंत सोरेन यांनी आपल्या कार्यकाळात सरना कोड प्रस्ताव आणि झारखंड डोमिसाइल बिल पास करून मोठं कार्ड खेळलं आहे.

बाबूलाल मरांडी

बाबूलाल मरांडी राज्याचे पहिले मुख्यमंत्री राहिलेत. आता ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मरांडी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सहभागी झाले. राजकराणात येण्याआधी ते शिक्षक होते. त्यांनी १९९८ आणि १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत झामुमोचे प्रमुख शिबू सोरेन यांना त्यांच्या बाल्लेकिल्ला दुमका येथे पराभूत केलं होतं. त्यावेळी ते खूप लोकप्रिय झाले होते. पण नंतर त्यांचे भाजपसोबतचे संबंध बिघडले आणि २००६ मध्ये त्यांनी झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) स्थापन केला.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर भाजपने बाबूलाल मरांडी यांच्याशी युती केली आणि २०२० मध्ये मरांडी भाजपमध्ये परतले. हे असं का तर झारखंडमध्ये २०१४ मध्ये आदिवासींसाठी राखीव असलेल्या ११ जागांच्या तुलनेत २०१९ मध्ये भाजपला फक्त दोन जागा मिळाल्या होत्या. तर झामुमोच्या नेतृत्वाखालील आघाडीने राज्यातील २८ पैकी २५ जागा जिंकल्या होत्या. त्याचवेळी झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांच्या विरुद्ध आदिवासी चेहरा असावा यासाठी भाजपने बाबूलाल मरांडी यांना पक्षाचा प्रदेशाध्य बनवलं. या निवडणुकीत त्यांना झारखंडमधील त्यांच्या दबदबा दाखवयाचा आहे.

हिमंता बिस्वा सरमा

भाजपने आसामचे मुख्यमंत्री आणि हिंदुत्वाच्या राजकारणाचे मोठे चेहरे आहेत. हिमंता बिस्वा सरमाला झारखंडच्या निवडणुकीचा सह प्रभारी बनवण्यात आलंय. सरमा यांनी आपलं राजकरणाचं कौशल्य दाखवत माजी मुख्यमंत्री चंपई सोरोने यांना आणि त्यांचे सुपूत्र तसेच झामुमोटे नेते लोबिन हेमब्रोमला भाजपमध्ये सहभागी करून घेण्यात यशस्वी ठरले. सरमा मागील काही वर्षात पूर्वोत्तर भागात भाजपचे मोठे रणनीतीकार म्हणून उद्यास आलेत. त्यांनी आसाम विधानसभा निवडणुकीत पक्षाचं नेतृत्त्व केलं होतं. त्यात भाजपला मोठं यश मिळवून दिलं होतं.

चंपाई सोरेन

चंपाई सोरेन यांनी वेगळ्या झारखंड राज्याच्या निर्मितीच्या आंदोलनात भाग घेतला होता. १९९५ मध्ये त्यांनी प्रथमच सेरायकेला मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली. यानंतर त्यांनी अनेक वेळा निवडणुका जिंकल्या आणि सोरेन कुटुंबानंतर जेएमएममधील सर्वात लोकप्रिय नेता बनले. या वर्षाच्या सुरुवातीला हेमंत सोरेनला तपास यंत्रणांनी अटक केल्यावर चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते.

या खुर्चीवर ते ५ महिने राहिले पण हेमंत सोरेन तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांना खुर्ची सोडावी लागली होती. त्यानंतर बंडखोरी करत ते भाजपमध्ये सामील झाले. चंपाई सोरेन यांना पूर्ण सन्मान देत भाजपने त्यांना आणि त्यांच्या मुलाला तिकीट दिले आहे. त्यांच्या प्रभावाखालील भागात भाजपला विजय मिळवून देण्यात चंपाई सोरेन यशस्वी ठरले, तर भाजपमधील त्यांचा दर्जा वाढू शकतो.

कल्पना सोरेन

हेमंत सोरेन तुरुंगात असताना कल्पना सोरेन यांनी त्यांच्या अनुपस्थितीत लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली. त्यांनी जेएमएम आणि इंडिया अलायन्ससाठी जोरदार प्रचार केला. गंडेया विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची जोरदार सुरुवात केली. राज्यात इंडिया आघाडीने पुन्हा सरकार स्थापन केल्यास कल्पना सोरेन यांचीही त्यात महत्त्वाची भूमिका असेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: जागावाटपात शिंदेंची तडजोड नाही? सर्व्हेविरोधात एल्गार? दिल्लीवारीतून जागांचा तिढा सुटणार?

Sanjiv Khanna: संजीव खन्ना असतील देशाचे पुढील सरन्यायाधीश, 11 नोव्हेंबरला स्वीकारणार पदभार

Ramtek Assembly Constituency : रामटेकवरुन महाविकास आघाडीत रामायण? ठाकरेंकडून उमेदवारी,काँग्रेसच्या हालचाली, पाहा VIDEO

Maharashtra News Live Updates: न्यायमूर्ती संजीव खन्ना होणार भारताचे सरन्यायाधीश, 11 नोव्हेंबर रोजी घेतील शपथ

Congress First Candidate List : काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; देवेंद्र फडणवीसांविरोधात शिलेदार उतरवला, वाचा लिस्ट

SCROLL FOR NEXT