crime news Saam tv
देश विदेश

Crime : सोनमपेक्षाही भयंकर कारनामा; दिराशी अनैतिक संबंध, नवऱ्यावर गोळीबार, सासूला क्रूरपणे संपवलं

crime news : सोनमपेक्षाही भयंकर कारनामा पूजाने केला आहे. पूजाने केलेल्या कारनाम्याने देशात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

राजा रघुवंशी हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला. सोनम रघुवंशीने बॉयफ्रेंडच्या साथीने नवऱ्याला संपवलं. या हत्याकांडाने देशात खळबळ उडाली. त्यानंतर सोनमपेक्षाही भयंकर कारनामा झांसीच्या एका महिलेने केला आहे.

झांसीची सून झालेल्या महिलेने सोनम रघुवंशी पेक्षाही खतरनाक हत्याकांड केलं आहे. पूजाने सासूला संपवलं. महिलेने दिरासोबतही अनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. काही दिवसांनी दिराचाही संशयास्पद मृत्यू झाला. पूजाने गुंडांना सांगून नवऱ्यावर गोळीबार केला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

महिलेच्या सासऱ्याकडे १६ बीघा जमीन होती. दिराच्या मृत्यूनंतर महिलेच्या वाट्याला ८ बिघा जमीन येणार होती. ही जमीन विकून तिला ग्वालियरला राहायला जायचं होतं. पण सासू यायला तयार नव्हती. सासऱ्याला मार्गातून काढण्यासाठी महिलेने बहिणीच्या बॉयफ्रेंडची मदत घेतली. त्याच्या साथीने सासूला संपवलं.

सूनेने सुशीला देवींची २४ जून रोजी हत्या केली. एका बंद खोलीत त्यांचा मृतदेह आढळला. बंद खोलीला बाहेरून कडी होती. यामुळे सुशीला देवीचा मुलगा अजयने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने नाकाबंदी सुरु केली. त्यानंतर एका आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला.

सासूला कसं संपवलं?

पूजाने ग्वालियरमधील एका कार्यक्रमात पती आणि सासूला बोलावलं. त्यावेळी बहिणीच्या बॉयफ्रेंडच्या साथीने सासू सुशीलाची गळा दाबून हत्या केली. गुन्हा नोंदवल्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी सुरु केली. नाकाबंदीदरम्यान एका थांबवलं. त्यावेळी त्याने पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी दिलेल्या प्रत्युत्तरात आरोपीच्या पायाला गोळी लागली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून ८ लाखांचे सोने जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही बहिणी आणि बॉयफ्रेंडला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bogus Cement : निकृष्ट दर्जाचे सिमेंट नामांकित कंपनीच्या बॅगमध्ये भरून विक्री; कल्याण पूर्वमध्ये बनावट सिमेंट फॅक्टरीचा पर्दाफाश

Box Office Collection : 'कांतारा' गाजवतोय अख्खं मार्केट; तर 'सनी संस्कारी'च्या कमाईत घट, कलेक्शनचा आकडा किती?

Maharashtra Live News Update : बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गातून आरक्षण मागणीसाठी भव्य महामोर्चा

Singer Passes Away: आधी बाईकवरुन अपघात, नंतर हार्ट अटॅक; प्रसिद्ध गायकाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

चंद्रकांत पाटलांचा निकटवर्तीय समीर पाटीलचा निलेश घायवळसोबत फोटो; रवींद्र धंगेकरांनी थेट पुरावाच दाखवला|VIDEO

SCROLL FOR NEXT