Abhijeet Dipke saam tv
देश विदेश

जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे; CJPची घोषणा, सरकारनं कोणत्या मागण्या केल्या मान्य?

CJP Protest: आपल्या मागण्या झाल्या आहेत. आंदोलकांना विनंती करतो की त्यांनी आंदोलन मागे घ्यावे आणि शांततापूर्वक आपापल्या घरी जावे असे रांकाने सांगितले.

Bharat Jadhav

आपल्या मागण्या झाल्या आहेत. आंदोलकांना विनंती करतो की त्यांनी आंदोलन मागे घ्यावे आणि शांततापूर्वक आपापल्या घरी जावे असे रांकाने सांगितले. नीट पेपरफुटीप्रकरणी दिल्लीच्या जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. ३६ दिवसांनी हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी ही घोषणा केली.

नीट पेपरफुटीप्रकरणी दिल्लीच्या जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. ३६ दिवसांनी हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी ही घोषणा केली. सीजेपी प्रवक्ते आणि केंद्र सरकारमध्ये आज तिसऱ्यांदा चर्चा झाली. या चर्चेआधी धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान मोदींकडे दिला.

प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री राजेंद्र सिंह यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर चौघांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत आंदोलनाविषयी मोठी घोषणा केली. सरकारनं आमच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे आम्ही जंतरमंतरवरील आंदोलन मागे घेत आहोत. विद्यार्थ्यांनी आपआपल्या घरी जावे असं सौरभ दास म्हणाला.

आज काही वेळापूर्वी धर्मेद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. आमची पहिली मागणी मान्य केली. दुसरी मागणी होती, ती सगळे एफआयआर आंदोलकांविरोधात दाखल आहेत. दिल्लीत, सर्व राज्यांत त्या मागे घेण्यात याव्यात. ही मागणीही सरकारने मान्य केली. एफआयआर फाईल झाल्या आहेत दिल्लीत. त्या सगळ्या कॉपी शॉर्टलिंक आमच्यासोबत शेअर करतील.

त्या कॉपी ३-४ दिवसांच्या आत मिळतील. त्यामागे घेण्यात येतील, असे आश्वासन सरकारने दिले आहे. आंदोलक आणि आयोजक आहेत. त्यांच्याविरोधात भविष्यात कुणावरही अॅक्शन घेतली जाणार नाही. सरकार लेखी मंगळवारपर्यंत शेअर करेल. सरकारकडून लेखी हमी आहे, एफआयआर आणि भविष्यातील कारवाईच्या बाबतीत आम्हाला मिळेल. नीट पीडितांच्या कुटुंबीयांसाठी नुकसानभरपाई दिली जाईल. ५ मुद्द्यांचा ड्राफ्ट दिला होता. ४ आठवड्यात पुन्हा भेटू...त्या मागण्यांसंदर्भात दिलेल्या ड्राफ्टवर चर्चा होईल, अशी माहिती सौरभ दास यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: झेन जी च्या जल्लोषात, झेन अल्फा मुलंही सहभागी

Migraine Or Headache: तुम्हाला मायग्रेनचा त्रास आहे की साधी डोकेदुखी? जाणून घ्या दोघांमधील ७ मोठे फरक

Smartphone holes: स्मार्टफोनच्या खालच्या बाजूला का असतात छोटी छिद्रं?

Shivneri Fort : पुण्याजवळील शिवनेरी किल्ल्याची 'ही' रहस्ये तुम्हाला माहीत आहेत का? वाचून व्हाल थक्क

Swollen Feet Causes: पायांना सतत सूज येते? दुर्लक्ष करू नका, 'या' आजारांची असू शकते सुरुवात

SCROLL FOR NEXT