Landmine Blast Near LOC in Rajouri  Saamtv
देश विदेश

Jammu-Kashmir: राजौरीत LOC जवळ भूसुरूंगाचा भीषण स्फोट, JCO सह ४ जवान गंभीर जखमी

Landmine Blast Near LOC in Rajouri: जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये नियंत्रण रेषेजवळ भूसुरूंगाचा स्फोट झाला. या स्फोटात ४ जवान गंभीर जखमी झाले.

Priya More
  • जम्मू-काश्मीरमध्ये भीषण स्फोट

  • राजौरीतील LOC जवळ भूसुरुंगाचा भीषण स्फोट

  • एका JCO सहित ४ जवान गंभीर जखमी

  • नौशेरा सेक्टरमधील गस्ती दरम्यान घडली घटना

जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यामध्ये भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. राजौरीतील नियंत्रण रेषेजवळ भुसुरूंगाचा स्फोट झाला. मंगळवारी जवानांकडून सुरू असलेल्या नियमित गस्तीदरम्यान ही घटना घडली. अचानक भूसुरुंगाचा स्फोट झाला आणि यामध्ये ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरसह ४ जवान जखमी झाले.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमधील कलाल भागात घडली. लष्कराच्या जवानांची एक तुकडी सीमेवर नियमित गस्त घालत असताना अचानक भूसुरुंगाचा मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज ऐकून सीमा भागात तैनात असलेल्या इतर जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी बचावकार्य केले.

या स्फोटामध्ये जेसीओ आणि ३ जवान गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ प्राथमिक उपचार देऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले. या चौघांवर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. तिघांची प्रकृती सध्या स्थिर आहे. या घटनेनंतर परिसरात गोंधळाचे वातावरण होते.

लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सीमेपलीकडून होणारी दहशतवादी घुसखोरी रोखण्यासाठी सुरक्षा उपाय म्हणून सीमा भागांमध्ये भूसुरुंग पेरले जातात. कधीकधी मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे हे भूसुरुंग त्यांच्या मूळ जागेवरून वाहून जाऊ शकतात आणि दुर्गम बनतात. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षा दलांनी परिसरातील शोधमोहीम तीव्र केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

SCROLL FOR NEXT