Omar Abdullah Saam Tv
देश विदेश

Jammu Kashmir Election Result: आम्ही जिंकू अशी आशा, ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया

Omar Abdullah On Jammu Kashmir Election Result: नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी गंदरबल आणि बडगाम या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली. सध्या ते बडगाममध्ये आघाडीवर आहेत.

Priya More

जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या ९० जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये भाजप आणि काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडी यांच्यात काटे की टक्कर दिसून येते. जम्मू-काश्मीरच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अशामध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांचे वक्तव्य समोर आले आहे. निवडणुकीत विजयाची आशा त्यांनी व्यक्त केली आहे. ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, 'जम्मू-काश्मीरमध्ये जनतेच्या जनादेशाची फसवणूक होऊ नये आणि केंद्र अथवा राजभवनाने कोणत्याही 'जुगाड'मध्ये सहभागी होता कामा नये.'

ओमर अब्दुल्ला हे गंदरबल आणि बडगाममधून निवडणूक लढवली आहे. सध्या बडगाम मतदारसंघातून ते आघाडीवर आहेत. ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले की, 'माझ्या सर्व सहकाऱ्यांना मी आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो. आम्ही चांगली लढत दिली आहे आणि आता त्याचे निकालही लागतील. आम्ही जिंकू अशी आशा आहे.' जम्मू-काश्मीरच्या मतदारांनी काय निर्णय घेतला हे आज दुपारपर्यंत कळेल. मतमोजणीत पारदर्शकता असावी असेही त्यांनी सांगितले. जनतेचा जनादेश भाजपच्या विरोधात असेल तर त्यांनी कोणतीही हालचाल करू नये.

ओमर अब्दुल्ला यांनी पुढे असेही सांगितले की, 'पारदर्शकता असली पाहिजे. जे काही होईल ते पारदर्शक पद्धतीने व्हायला हवे. जनादेशाची फसवणूक होता कामा नये. जनादेश भाजपच्या विरोधात असेल तर भाजपने जुगाड किंवा अन्य कोणतीही युक्ती वापरू नये. राजभवन आणि केंद्रातील जनतेचे निर्णय स्वीकारणे आवश्यक आहे. आम्ही विजयाची आशा बाळगतो. परंतु सर्व काही देवाच्या हातात आहे.'

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक निकालाचे १२ वाजेपर्यंत हाती आलेल्या कलानुसार काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स आघाडी ५१, भाजप २६, पीडीपी २ आणि इतर ९ जागांवर आघाडीवर आहे. जम्मू काश्मीरमध्ये कोणता पक्ष सर्वाधिक जागांवर विजयी होत सरकार स्थापन करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कंबरेला स्पर्श, किस करण्याचा प्रयत्न; दिवाळीच्या जत्रेत मुलीशी छेडछाड, घटनेचा Video Viral

Shehnaaz Gill: दिवाळी स्पेशल शहनाज गिलचा क्यूट व्हेल्व्हेट अनारकलीतील लूक, पाहा PHOTO

Blackheads: चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स होतील गायब, स्कीन करेल ग्लो; फक्त करा 'या' सोप्या गोष्टी

Museum Robbery: दिवसाढवळ्या लूव्र संग्रहालयात दरोडा; नेपोलियन आणि जोसेफिनचे दागिने चोरीला

Maharashtra Live News Update : ज्या संविधानाने देशाला एकसंघ ठेवले,पंतप्रधान मोदी म्हणतात की गीता बायबल कुराण पेक्षा संविधान हे प्रिय आहे - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT