Jammu Bus Accident Saam Tv
देश विदेश

Jammu Bus Accident: जम्मूमध्ये बस दरीत कोसळून भीषण अपघात; 12 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

Accident News: बस अमृतसरहून कटराकडे जात असताना बसचे नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली.

साम टिव्ही ब्युरो

Jammu Kashmir News : जम्मू-काश्मीरमधून एका भीषण अपघाताची घटना समोर येत आहे. जम्मूच्या झज्जर कोटली भागात बस अपघात झाला आहे. या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बस अमृतसरहून कटराकडे जात असताना बसचे नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थली दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे. (Latest News)

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सूत्रांनी सांगितले की, बसमध्ये सुमारे 70-75 लोक प्रवास करत होते. त्यापैकी काहींचा जागीच मृत्यू झाला. काहींना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

जम्मूपासून 30 किमी अंतरावर असलेल्या झज्जर कोटली भागात बसचा अपघात झाला. बसमध्ये वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी निघालेले प्रवासी देखील होते. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आजूबाजूच्या भागातील स्थानिक लोक आणि पोलिसांनी संयुक्तपणे बचावकार्य सुरु केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune ST Bus : एसटी बस कंडक्टरवर जीवघेणा हल्ला, लोखंडी रोडने मारहाणीचा प्रयत्न; पुण्यात भयंकर घडलं

Beed News: धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेचे वाजले तीन-तेरा|VIDEO

Maharashtra Live News Update: पुणे ड्रग्स पार्टी प्रकरणी अपडेट; खराडीच्या स्टे बर्डमध्ये एप्रिल महिन्यात झाली होती पार्टी

Smart Women's: हुशार स्त्रियांमध्ये असतात 'हे' ६ गुण, तुम्हाला माहितीयेत का?

Maulana Controversy : माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर वादग्रस्त वक्तव्य; कार्यकर्त्यांनी मौलानाला स्टुडिओमध्ये चोपलं, VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT