दक्षिण काश्मीरमध्ये दहशत पसरवणाऱ्या हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांचा खात्मा Saam Tv
देश विदेश

दक्षिण काश्मीरमध्ये दहशत पसरवणाऱ्या हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू- काश्मीरच्या अवंतीपोराच्या पंपोर भागामध्ये आज भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चांगलीच चकमक झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : जम्मू काश्मीरच्या Jammu and Kashmir अवंतीपोराच्या Avantipore पंपोर Pampore भागामध्ये आज भारतीय सैन्य Indian Army आणि दहशतवाद्यांमध्ये terrorists चांगलीच चकमक झाली आहे. बराच तास चाललेल्या चकमकीवर भारतीय सैन्याने २ दहशतवाद्यांच्या खात्मा करण्यात यश आले आहे. ठार झालेले दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीनच्या हिट स्क्वॉयडचा एक भाग होते. तसेच त्यांनी दक्षिण काश्मीर मधील सामान्य नागरिकांची हत्या Murder देखील केली होती.

हे देखील पहा-

दहशतवाद्यांकडून १ रायफल आणि १ पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. ठार करण्यात आलेल्या १ दहशतवाद्याच नाव मुसाएब मुश्ताक असल्याचे सांगितले जात आहे. काश्मीरच्या IGP विजय कुमार यांनी माहिती दिली की, मुसाएब हा खिरयूचा रहिवासी होता. त्याने २३ जुलै दिवशी सरकारी शाळेत एका शिपायाची हत्या केली होती. गुरुवारी श्रीनगरच्या सराफ कदल या भागात सुरक्षा दलांवर दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यामध्ये २ पोलिसांसह ३ जण जखमी झाले आहेत.

दहशतवाद्यांनी रात्री ९ वाजून २० मिनिटांनी सुरक्षा दलाच्या वाहनावर ग्रेनेड फेकले होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत, त्यामध्ये त्यांची प्रकृती स्थिर आहे. गुरुवारी जम्मू- काश्मीरमध्ये राजौरी जिल्ह्यामधील थानामंडी भागात भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चांगलीच चकमक झाली आहे. या चकमकीमध्ये एका दहशतवाद्यांला ठार करण्यात भारतीय जवानांना मोठे यश आले आहे.

तसेच यामध्ये भारतीय सैन्याचे एक JOC देखील यामध्ये शहीद झाले आहेत. एक पोलीस अधिकाऱ्यांने सांगितलेल्या माहितीनुसार, दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर जवानांनी थानामंडी भागात सर्च ऑपरेशनला सुरुवात करण्यात आले होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: स्मशानभूमीतून घरी परतल्यानंतर आपण आंघोळ का करतो?

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Parali News : पुराच्या पाण्यात कार गेली वाहून; तिघांना वाचविण्यात यश, एकाचा शोध सुरू

Mumbai School Bus : माणुसकी! मुंबईला पावसाचा तडाखा, स्कूल बस अडकली पाण्यात, धो धो पावसात पोलिसांनी मुलांना वाचवले

Tapola Tourism : महाबळेश्वरपासून हाकेच्या अंतरावर वसलय हिडन हिल स्टेशन पाहा काश्मिरसारखे सौंदर्य क्षणात

SCROLL FOR NEXT