Jammu and Kashmir: दहशतवाद्यांचा पुन्हा ग्रेनेड हल्ला; 1 ठार Saam Tv
देश विदेश

Jammu and Kashmir: दहशतवाद्यांचा पुन्हा ग्रेनेड हल्ला; 1 ठार

भारताच्या सीमेवर दहशतवाद्यांनी हल्ल्यांचे सत्र कायम सुरूच ठेवले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: एकीकडे जगभर रशिया (Russia) विरुद्ध युक्रेनच्या युद्ध चालू आहे. तर भारताच्या (India) सीमेवर दहशतवाद्यांनी हल्ल्यांचे सत्र कायम सुरूच ठेवले आहे. श्रीनगरच्या (Srinagar) हरि सिंह हाय स्ट्रीट भागामध्ये रविवारी दहशतवाद्यांनी (Terrorists) सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्ला (Attack) केला आहे. यामध्ये एका व्यक्तिचा मृत्यू झाला असून, जवळपास ३४ जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार प्रसिद्ध लाल चौकाजवळ हरी सिंह हाय स्ट्रीट भागामध्ये संध्याकाळी ४ वाजून २० मिनिटांनी हा हल्ला (Attack) करण्यात आला आहे. (Jammu and Kashmir Terrorist grenade attack again)

हे देखील पहा-

या घटनेमध्ये जॉन मोहम्मद नावाच्या पोलिसासह (police) ३४ जण जखमी झाले आहेत. जखमींना श्री महाराजा हरिसिंह रुग्णालयामध्ये (hospital) दाखल करण्यात आले आहे. मोहम्मद अस्लम मखदूमी (वय-७०) असे मृताचे नाव आहे. तो शहरातील नौहट्टा भागामधील रहिवासी होता. परिसराची नाकाबंदी (Blockade) करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

श्रीनगरमधील या ग्रेनेड हल्ल्यापाठीमागे नेमका कोणत्या दहशतवादी संघटनेचा हात आहे, हे अद्याप आजून देखील समजले नाही. सुरक्षा दलांनी परिसरामध्ये शोध मोहीम सुरू केली आहे. श्रीनगर येथील अमृता कादल मार्केटमध्ये हा हल्ला झाला आहे. यावेळी तिथे मोठी गर्दी होती. दहशतवाद्याविरोधामध्ये सुरक्षा दलांकडून सुरू असलेल्या कारवाईच्या दरम्यान श्रीनगरमध्ये हा हल्ला झाला आहे. मागील काही महिन्यांत जम्मू- काश्मीर पोलीस आणि निमलष्करी दलांनी अनेक मोठ्या दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार की, ग्रेनेड हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्यांची ओळख पटवण्याचे आणि त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांना काही महत्त्वाचे लीड्स मिळाले आहेत आणि तपास योग्य दिशेने सुरू आहे. जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या हल्ल्याचा निषेध केला आणि सांगितले आहे की, दहशतवादाची परिसंस्था मोडून काढण्याचा आणि शेजारील देशाच्या योजनांना हाणून पाडण्याचा सरकारचा निर्धार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Tourism : तीन टेकड्यांवर उभा असलेला अभेद्य भव्य किल्ला, 'येथे' घ्या रोमांचक ट्रेकिंगचा अनुभव

Korean Skin Care Tips: सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी फॉलो करा 'कोरियन स्किनकेअर रूटीन', या 5 घरगुती टिप्स

Mumbai : 'बुलाती है मगर जाने का नहीं' पुरुषांना जाळ्यात ओढायच्या, कॅफेत नेऊन भलतंच करायच्या, मुंबईतील धक्कादायक प्रकार समोर

Maharashtra Live News Update : पुण्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला

कीर्तनकाराचं काळं कृत्य, पक्कडीने चटके देऊन अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार, अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT