Jammu and Kashmir terrorists arrested Saam TV
देश विदेश

Jammu-Kashmir News : जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; जैश-ए-मोहम्मदच्या ६ साथीदारांना अटक

Satish Daud

जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत जैश-ए-मोहम्मदच्या ६ साथीदारांना अटक ६ अटक केली आहे. त्यांच्याकडून आयईडी, शस्त्रास्त्रे आणि इतर स्फोटक साहित्य जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेले सहाही आरोपी तरुण असून त्यांच्यावर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या तरुणांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले करणारी जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना काही तरुणांचे ब्रेनवॉश करत त्यांना दहशतवादी कारवाया करण्यास प्रेरित करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी छापा टाकला. यावेळी ६ संशयित शस्त्रसाठ्यासह आढळून आले.

पोलिसांनी तातडीने कारवाई करत या संशयित तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 आयईडी, 30 डिटोनेटर, 17 आयईडीच्या बॅटरी, 2 पिस्तूल, 3 मॅगझिन, 25 राउंड, 4 हँडग्रेनेड आणि 20 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.सध्या जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम आहे.

त्यामुळे दहशतवादी कारवाया वाढल्या असून अनेक ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडत आहेत. जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना सातत्याने सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ले करीत आहेत. यासाठी दहशतवादी संघटनेकडून काही तरुणांचा वापर देखील केला जात आहे. तरुणांना दहशतवादी कारवाया करण्यासाठी शस्त्र, दारूगोळा आणि स्फोटकांचा पुरवठा केला जात आहे.

त्यामुळे दहशतवाद्यांशी संपर्कात असलेल्या अशा तरुणांवर पोलिसांची करडी नजर आहे. दरम्यान, यापूर्वी १२ ऑगस्ट रोजी सुरक्षा दलांनी ९ जणांना अटक केली होती. त्यांच्याकडून देखील मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. पोलिसांवर तसेच सुरक्षा दलांवर हल्ले करण्यासाठी दहशतवादी या तरुणांचे ब्रेनवॉश करत होते. तसेच त्यांना शस्त्रे आणि दारूगोळा देखील पुरवत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshay Shinde : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका, पोलिसांना निलंबित करण्याची मागणी

Maharashtra News Live Updates:विधानसभा निवडणुकीपूर्वी सुप्रीम कोर्ट घड्याळ चिन्हबाबत निर्णय देणार ?

Bigg Boss Marathi Suraj Chavan: सुरजचं लग्न कधी होणार? बिग बॉसच्या घरातच ठरणार कार्यक्रम; शरद उपाध्याय यांनी केली भविष्यवाणी

Traveling Tips: विमान प्रवास करताना उलट्यांचा त्रास होतो, तर करा 'हे' उपाय

Rules Change : १ ऑक्टोबरपासून १० गोष्टींमध्ये बदल; खिशाला कात्री लागण्याआधी वाचा नवे नियम

SCROLL FOR NEXT