Jammu And Kashmir Car Accident ANI
देश विदेश

भयंकर! चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट दरीत कोसळली; ७ जणांचा मृत्यू, ४ गंभीर

जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला.

वृत्तसंस्था

जम्मू : जम्मू काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात एक भीषण अपघात (Accident) झाला. भरधाव वेगात जाणारी कार थेट दरीत कोसळली. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून ४ जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांचा (Police) ताफा घटनास्थळी दाखल झाला. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली. (Jammu And Kashmir News Today)

मिळालेल्या प्राथामिक माहितीनुसार, किश्तवाडच्या चिनगाम भागात प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या कारचा भीषण अपघात झाला. कारवरून चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, सुमो कार ही थेट दरीत कोसळली. या कारमधून ११ प्रवासी प्रवास करीत होते. यामधील ७ जणांचा जागीच मृत्यू झाला तर ४ जण गंभीर जखमी झाले.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलीस आणि लष्कराच्या जवानांकडून बचावकार्य सुरू आहे. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. (Jammu And Kashmir Accident News)

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाब नबी आझाद यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलंय. 'जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील चतारू येथे झालेल्या भीषण अपघातात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच मला खूप दुःख झाले. मी अपघातातील जखमींसाठी प्रार्थना करतो. मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबाप्रती माझे संवेदना आहेत, त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे' असं ट्विट गुलाब नबी आझाद यांनी केलंय.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३ लाख ५१ हजार शेतकरी पात्र, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

SCROLL FOR NEXT