Jammu and Kashmir Assembly Elections 2024 Saam tv
देश विदेश

J&K Election: जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची तिसरी यादी जाहीर, कोणाला कुठून मिळाली संधी? वाचा

BJP Third List : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज आपली तिसरी यादी जाहीर केली.

Satish Kengar

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. तिसऱ्या यादीत भाजपने 29 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यातच देविंदर सिंह राणा यांना नगरोटा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं आहे. तर गुलाबगड ही एसटीसाठी राखीव जागा आहे. भाजपने येथून मोहम्मद अक्रम चौधरी यांना उमेदवारी दिली आहे.

हब्बाकडल विधानसभा मतदारसंघात भाजपने अशोक भट्ट याना संधी दिली आहे. याआधी जम्मू-काश्मीर निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी भाजपने सोमवारी 16 उमेदवारांची नावे जाहीर केली. पहिल्या टप्प्यात 18 सप्टेंबर रोजी दक्षिण काश्मीरमधील 16 विधानसभा मतदारसंघ आणि जम्मू प्रदेशातील 8 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत 15 उमेदवारांची नावे होती, तर काही वेळातच जाहीर झालेल्या दुसऱ्या यादीत केवळ 1 उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले.

भाजप आपल्या दुसऱ्या यादीत तिन्ही टप्प्यांसाठी एकूण 44 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. ज्यात दुसऱ्या टप्प्यासाठी 10 आणि तिसऱ्या टप्प्यासाठी 19 उमेदवारांचा समावेश आहे. मात्र नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी जाहीर करण्यात आलेली उमेदवारांची यादी मागे घेण्यात आली. यानंतर भाजपने पुन्हा नवीन यादी जाहीर केली ज्यात 15 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. राज्यातील 90 सदस्यीय विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यात 18 सप्टेंबर, दुसऱ्या टप्प्यात 25 सप्टेंबर आणि तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात 1 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. 4 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया19 ऑगस्ट आणि 5 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

ऑगस्ट 2019 मध्ये घटनेतील कलम 370 रद्द केल्यानंतर यथे पहिलीच विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. 2014 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 25 जागा जिंकल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Air fare Hike: युद्धाचा फटका विमान प्रवासाला, तिकीटाच्या दरात मोठी वाढ; किती खर्च करावा लागणार?

कोरोना लसीमुळे साईड इफेक्ट्स झाला? सरकारला द्यावा लागणार मोबदला; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Maharashtra Live News Update : कोल्हापूरमध्ये कमर्शियल गॅस पुरवठा तात्पुरता बंद

New Rule : कार, दुचाकी ट्रान्सफरसाठी आता NOC ची गरज नाही, सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय, वाचा

Trending Blouse Designs: ब्लाऊजच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स, कोणत्याही साडीत उठून दिसेल मागचा गळा

SCROLL FOR NEXT