Jammu Kashmir Latest News:  Saamtv
देश विदेश

Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu and kashmir latest News : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराने मोठी कारवाई केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी झालेल्या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

Vishal Gangurde

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये लष्काराने मोठी कारवाई केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दोन ठिकाणी सुरक्षा दलाच्या जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर सुरक्षा दलाचे चार जवान घायाळ झाले आहेत.

काश्मीरच्या श्रीनगर जिल्ह्यातील खानयारमध्ये आज शनिवारी सकाळपासून चकमक सुरु आहे. या चकमकीत एका सुरक्षा दलाने एका दहशतवाद्याचा खात्मा केला. या भागात आणखी काही दहशतवादी लपल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. श्रीनगरमधील खानयारमध्ये सुरक्षा दलाकडून ऑपरेशन राबवलं जात आहे.

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये दुसरी चकमक ही दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील लारनूमध्ये सुरु आहे. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या दोन्ही चकमकीत एकूण तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे.

चकमकीत ४ जवान जखमी

मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील मागाम भागात रात्री दोन मजुरांवर दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात दोन्ही मजूर जखमी झाले. या घटनेनंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांचा तपास सुरु केला. श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत ४ सुरक्षा दलाचे जावन जखमी झाले. यामध्ये जम्मू काश्मीर पोलीलस स्पेशल ऑपरेशन गटाचे २ आणि सीआरपीएफचे क्विक एक्शन टीमचे २ जवान जखमी झाले. श्रीनगरमध्ये गेल्या ७ तासांपासून चममक सुरु आहे

दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने सकाळी खानयारमध्ये ठाण मांडलं. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी तातडीने दहशतवाद्यांच्या विरोधात अभियान सुरु केलं. सर्च ऑपरेशनदरम्यान, दहशवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. यानंतर नंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT