Kalyan Kale Kalyan Kale
देश विदेश

मोठी बातमी! महाराष्ट्रातील खासदार अडकले इराण-इस्रायल युद्धात, दुबईतून आली महत्त्वाची अपडेट

Kalyan Kale stranded in Dubai news update : इराण-इस्त्राइल तणावामुळे आखाती देशांतील विमान सेवा विस्कळीत झाल्याने जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे दुबईत अडकले आहेत. ते सुरक्षित असल्याची माहिती मिळाली असून परिस्थिती सामान्य झाल्यानंतर त्यांच्या परतीची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

अक्षय शिंदे पाटील, जालना प्रतिनिधी

Kalyan Kale Dubai : इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे आखाती देशांतील विमान सेवा विस्कळीत झाली आहे. याचा फटका अनेक भारतीयांना बसला आहे. दुबईत फिराण्यासाठी, कामानिमित्त गेलेल अनेकजण तिथेच अडकलेले आहेत. त्यामध्ये जालन्यातील काँग्रेस खासदार डॉ. कल्याण काळे यांचा समावेश आहे. कल्याण काळे यांच्यासह जालन्यातील ८ नागरिकही दुबईत युद्धजन्य परिस्थितीमुळे अडकले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस खासदार डॉ. कल्याण काळे हे २७ फेब्रुवारी रोजी कुटुंबीयांसह खासगी सहलीसाठी दुबईला गेले होते. पण अचानक इस्त्राइल आणि इराण यांच्यातील युद्धाचा भडका उडाला. या आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्याचाच फटका कल्याण काळे यांना बसला आहे. युद्धाच्या परिस्थितीमुळे ते दुबईत अडकले आहेत. आता ठरलेल्या वेळी त्यांना भारतात परत येणं शक्य होणार नाही.

खासदार काळे यांच्या सुरक्षेबाबत जालन्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पण ते सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे. कल्याण काळे यांचे बंधू भाऊसाहेब काळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून महत्त्वाची माहिती दिली. ते म्हणाले की, खासदार डॉ. कल्याण काळे आणि त्यांचे कुटुंबीय दुबईत पूर्णपणे सुरक्षित आहेत. विमान सेवा बंद असल्याने त्यांना तिथे थांबावे लागले आहे, मात्र काळजी करण्याचे कारण नाही. परिस्थितीत पूर्वरत झाल्यानंतर ते जालन्याला परत येतील.

जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, खासदार कल्याण काळे यांच्याशिवाय जालना जिल्ह्यातील इतर ८ नागरिकही दुबईत अडकले आहेत. युद्धामुळे विमानतळांवरील निर्बंध आणि विमान सेवा स्थगित झाल्याने हे सर्वजण तिथे अडकून पडले आहेत. प्रशासनाकडून या नागरिकांच्या परतीसाठी आणि त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी हालचाली सुरू आहेत. परिस्थिती पूर्वपदावर येताच त्यांना मायदेशी आणले जाईल अशी शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chikankari Kurti Designs: महिलांसाठी चिकनकारी कुर्तीचे 5 युनिक डिझाईन्स; ऑफिस आणि डेलीवेअर लूकसाठी एकदम परफेक्ट

Political News: भाजप पदाधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, पक्षातील अंतर्गत वादानंतर घडली भयंकर घटना

पोलीस कॉन्स्टेबल 3 दिवसांपासून बेपत्ता, नंतर बस डेपोत मृतदेह; घटनेने खळबळ

Maharashtra News Live Update: अमरावती विभाग शिक्षक आमदारकीसाठी काँग्रेसची ११ सदस्यीय निवडणूक समिती गठीत

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांना न्यायालयाचा मोठा दिलासा! सर्व प्रकरणांतून दोषमुक्त, अखेरचा खटलाही रद्द

SCROLL FOR NEXT