Jaipur Wall Collapse saam Tv
देश विदेश

Jaipur Wall Collapse: भीषण दुर्घटना! जयपूरमध्ये भिंत कोसळून 3 जणांचा मृत्यू; अनेक जण ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता

Jaipur Wall Collapse: जयपूरजवळ बांधकामातील भिंत कोसळून तीन मजुरांचा मृत्यू झाला. अनेक मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती असून घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

Shruti Vilas Kadam

Jaipur Wall Collapse: राजस्थानची राजधानी जयपूरजवळ सोमवारी भीषण दुर्घटना घडली. आमेर परिसरातील ताला मोडजवळ बांधकामाधीन रिटेनिंग (आधार) भिंत अचानक कोसळल्याने तीन मजुरांचा मृत्यू झाला, तर अनेक मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रशासनाने तातडीने मोठे बचाव कार्य सुरू केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुर्घटनेच्या वेळी अनेक मजूर बांधकामाच्या ठिकाणी काम करत होते. अचानक भिंतीचा मोठा भाग कोसळल्याने मजुरांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. काही कामगार ढिगाऱ्याखाली दबले गेले, तर काही जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.

बचाव पथकांनी जेसीबी आणि इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने ढिगारा हटवण्याचे काम सुरू केले आहे. अडकलेल्या मजुरांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Raid On Lodge: लॉजमधील एका रुममध्ये २० मुलं-मुली; पोलिसांच्या धाडीनंतर उघडकीस आला खोलीतील भयानक प्रकार

Cricket Rules:क्रिकेटच्या नियमात मोठे बदल; BCCI कोणते नवीन नियम लागू करणार?

बॉलीवूडच्या भाईजानला झालंय काय?भाईजानच्या नव्या लूकमुळे चाहत्यांना चिंता, सलमान आजारी की प्रमोशन फंडा?

Maharashtra News Live Update: पुण्यातील नवले पुलावरील सेल्फी पॉईंटजवळ चारचाकी वाहनाला लागली आग

एक राजीनामा घेऊ शकत नाहीत, नरेंद्र मोदी सर्वाधिक तरुणविरोधी पंतप्रधान; राहुल गांधींची घणाघाती टीका

SCROLL FOR NEXT