Giorgia Meloni And PM Modi Video Saam Tv
देश विदेश

Giorgia Meloni And PM Modi Video: हॅलो फ्रॉम Melodi टीम; जॉर्जिया मेलोनी यांनी नरेंद्र मोदींसोबतचा सेल्फी व्हिडिओ केला शेअर

Giorgia Meloni Share a Video With PM Modi: इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

Siddhi Hande

इटली येथे आयोजित केलेल्या जी 7 शिखर परिषदेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत अनेक देशांच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली. या परिषदेत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व राष्ट्राध्याक्षांचे स्वागत केले होते. जॉर्जिया मेलोनी यांनी नरेंद्र मोदी यांचेही स्वागत केले होते. जॉर्जिया मेलोनी यांनी नुकताच नरेंद्र मोदींसोबतचा एक सेल्फी व्हिडिओ एक्स अकाउंटवर पोस्ट केला आहे.

जॉर्जिया मेलोनी यांनी G7 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींसोबत हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. त्यांनी या व्हिडिओत 'हॅलो फ्रॉम टीम मेलोडी' असं म्हटलं आहे. या व्हिडिओवर हाय फ्रेंड्स फ्रॉम मेलोडी, असं कॅप्शन देखील देण्यात आले आहे. गेल्या वर्षी दुबईतील COP 28 शिखर परिषदेदरम्यान जॉर्जिया यांनी नरेंद्र मोदींसोबतचा सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केला होता.

G7 शिखर परिषद इटलीमध्ये पार पडली. यावेळी अनेक देशांचे राष्ट्राध्यक्ष उपस्थित होते. या परिषदेसाठी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, युरोपीय परिषदेचे अध्यक्ष चार्ल्स मिशेल, जर्मन चान्सलर, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक हे इटलीमध्ये उपस्थित होते. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील सहभागी झाले होते. या परिषदेत नरेंद्र मोदींनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे. या वर्षी G7 शिखर परिषदेत भारत अतिथी देश म्हणून उपस्थित होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुरंदरमध्ये शिक्षकांचे धरणे आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाविरोधात घोषणाबाजी

Viral Video: ‘मी ड्रायव्हर आहे, नोकर नाही’, सिगारेट ओढणाऱ्या प्रवाशाला ड्रायव्हरने टॅक्सीतून उतरवलं, व्हिडीओ झाला व्हायरल

Bhootam Bhayyam: 'भूतम भयम्'साठी छाया कदम यांचे भन्नाट ट्रान्सफॉर्मेशन; 'जठाई'चा लूक पाहून व्हाल थक्क

स्मार्ट मीटर बसण्यापूर्वीच ४४० व्होल्टचा झटका; पाठवलं ५ महिन्यांचं वीजबिल, धक्कादायक प्रकरणाने राज्यात खळबळ

Shocking: नामांकित कोचिंग क्लासेसच्या संचालकांची आत्महत्या, चिंचेच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

SCROLL FOR NEXT