तुम्ही आयटी क्षेत्रात नोकरी करताय.. तर तुमची नोकरी धोक्यात आहे.. असं आम्ही म्हणतोय, कारण 2025 मध्ये आतापर्यंत 176 कंपन्यांनी 80 हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलयं.. त्यामुळे भारतातील 73 लाखाहून अधिका आयटीतील कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार लटकतेय.. 2024 मधील आकडेवारी आयटी क्षेत्रातील नोकरकपातीची दाहकता अधोरेखित करतेय.
एका अहवालानुसार, 2024 मध्ये 15 वर्षांहून अधिक वर्षांचा अनुभव असणाऱ्या 7,700 कर्मचाऱ्यांना आयटी कंपनीत नारळ देण्यात आला. मायक्रोसॉफ्टने 15 हजार तर टीसीएसनं 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं. याशिवाय मेटा, गुगल, अमेझॉन यांनी 20 ते 25 हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवलाय. तर डेल कंपनीनं 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे निर्देश दिलेत.
दरम्यान उद्योगातील मंदीचे वातावरण आणि बदलते तंत्रज्ञान यामुळे भविष्यात अजूनही मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात केली जात असल्याचा दावा नॅसकॉम याआधी केला होता. कोरोनानंतर अमेरिकेतही 7 लाख 40 हजाराहून अधिक कर्मचारी कपात करण्यात आली होती. त्यामुळे नोकरकपात होण्यामागे कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत. पाहूयात.
एआयच्या माध्यमातून कमी खर्चात अधिक काम होत असल्यानं आणि एआय तुलनेनं अधिक वेगवान पद्धतीनं काम करत असल्यानं आयटीतील अनुभवी कर्मचाऱ्यांनाही नोकरीवरून काढून टाकलं जातयं. तसचं नफ्याचा वाढता दबाव आणि ग्राहकांचे बदलते प्राधान्य ही आयटीतील नोकरकपातीला जबाबदार आहे.
देशात आधीच सरकारी नोकरी मिळवण्यासाठी लाखो तरुण आपल्या आयुष्यातील उमेदीची वर्ष घालवत असतात. त्यात 2025 च्या चौथ्या तिमाहीत फक्त 13 हजार 935 कर्मचाऱ्यांची आयटी क्षेत्रात भरती झालीय. त्यामुळे आयटीसह इतर क्षेत्रातील नवोदित आणि अनुभवी कर्मचाऱ्यांनीही बदलत्या काळानुसार नवं कौशल्यांवर भर द्यायला हवं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.