Isudan Gadhvi AAP News Saam TV
देश विदेश

Gujrat Eletions 2022: ईशुदान गढवी 'आप'चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार! अरविंद केजरीवाल यांची घोषणा

Isudan Gadhvi AAP News: गुजरात विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान (Voting) होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी येत्या १ आणि दुसऱ्या टप्प्यासाठी ५ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

Isudan Gadhvi AAP News: गुजरातमध्ये ईशुदान गढवी 'आप'चे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत. अरविंद केजरीवाल यांनी ही घोषणा केली आहे. गढवी हे पक्षाचे राष्ट्रीय संयुक्त महासचिव आहेत. गुजरात विधानसभेसाठी दोन टप्प्यात मतदान (Voting) होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी येत्या १ आणि दुसऱ्या टप्प्यासाठी ५ डिसेंबर रोजी मतदान होणार असून ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. (Gujrat Eletions 2022 Today News)

आत्तापर्यंत गुजरात विधानसभा निवडणूकीत भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) सामना होत आला आहे. मात्र, यंदाच्या निवडणूकीत गुजरातमध्ये पहिल्यांदाच आम आदमी (AAP) पक्षही मैदानात उतरला आहे. आज आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री पदासाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे.

या संदर्भात दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी मोबाईल क्रमांक देऊन जनतेच्या प्रतिक्रिया मागवल्या होत्या. त्यानुसार आज आपचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून ईशुदान गढवी यांची निवड करण्यात आली आहे.

अरविंद केजरीवाल यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीतही अशाच प्रकारे नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊन भगवंत मान यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित केलं होतं. त्यात ते यशस्वी ठरले होते. त्यामुळं पंजाबमध्ये वापरलेला पॅटर्न गुजरातमध्येही यशस्वी ठरणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. गुजरातमध्ये १९९५ पासून भाजपची सत्ता आहे. यावेळी भाजपला तगडं आवाहन मिळण्याची शक्यता आहे.

सदैव जनहितासाठी काम करेन: ईशुदान गढवी

मुख्यमंत्री पदासाठी निवड झाल्यानंतर ईशुदान गढवी यांनी जनतेचे आणि अरविंद केजरीवाल यांचे आभार मानले आहेत. ते म्हणाले माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल, माझ्यासारख्या सामान्य माणसाला एवढी मोठी जबाबदारी दिल्याबद्दल मी आम आदमी पार्टी, अरविंद केजरीवाल जी आणि विशेषत: गुजरातच्या जनतेचे मनापासून आभार मानू इच्छितो. जनतेचा सेवक बनून मी सदैव जनहितासाठी काम करेन, असे वचन देतो. असं ट्विट त्यांनी केलं आहे.

गुजरात विधानसभा निवडणूक वेळापत्रक

पहिल्या टप्प्यासाठी 5 नोव्हेंबरला अधिसूचना जारी होणार

दुसऱ्या टप्प्यासाठी 10 नोव्हेंबरला अधिसूचना जारी होणार

अर्ज छाननी

पहिला टप्पा: 15 नोव्हेंबर

दुसरा टप्पा:18 नोव्हेंबर

अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख

पहिला टप्पा: 17 नोव्हेंबर

दुसरा टप्पा: 21 नोव्हेंबर

किती टप्प्यात पार पडणार मतदान: दोन टप्प्यात निवडणूक

पहिला टप्पा: 1 डिसेंबर

दुसरा टप्पा: 5 डिसेंबर

मतमोजणीची तारीख: 8 डिसेंबर

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! हाच तो क्षण, ज्याची लाखो कार्यकर्ते वाट पाहत होती, पाहा व्हिडिओ

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

Marathi bhasha Vijay Live Updates : कोणाची माय व्यायली त्यांनी मुंबईला हात लावून दाखवावा - राज ठाकरेंचा इशारा

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT