Chandrayaan-3 Successful Landing Video  Saam Tv
देश विदेश

Chandrayaan-3 Landed Successfully: जय हो! चांद्रयान-३ चंद्रावर यशस्वीपणे उतरलं, अवघा भारत आनंदला!

Chandrayaan-3 Successful Landing Video: जय हो! चांद्रयान-३ चंद्रावर यशस्वीपणे उतरलं, अवघा भारत आनंदला!

Satish Kengar

Chandrayaan-3 Successful Landing Video: भारतासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. देशासह आवघ्या जागाच लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान-३ ची चंद्रावर यशस्वी लँडिंग झाली आहे. भारताने (India) घेतलेली ही एक मोठी झेप आहे. चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगने देशभरात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे.

इस्रोचे १६,५०० शास्त्रज्ञ गेल्या चार वर्षांपासून करत असलेली मेहनत आज यशस्वी झाली आहे. सॉफ्ट लँडिंगमध्ये तज्ज्ञ असलेल्या जगातील चार देशांमध्ये आता भारताचे नाव सामील झाले आहे.

चांद्रयान-३ ची लँडिंग कशी झाली?

  • विक्रम लँडरने २५ किमी उंचीवरून चंद्रावर उतरण्याचा प्रवास सुरू केला. पुढचा टप्पा गाठण्यासाठी त्याला सुमारे ११.५ मिनिटे लागली. म्हणजेच ७.४ किलोमीटर उंचीपर्यंत.

  • यान ७.४ किमी उंचीवर पोहोचला तोपर्यंत त्याचा वेग ३५८ मीटर प्रति सेकंद होता. पुढचा टप्पा ६.८ किलोमीटरचा होता.

  • ६.८ किमी उंचीवर वेग कमी होऊन ३३६ मीटर प्रति सेकंद झाला. पुढील टप्पा ८०० मीटर होता.

  • ८०० मीटर उंचीवर, लँडरच्या सेन्सर्सने चंद्राच्या पृष्ठभागावर लेझर किरण टाकून लँडिंगसाठी योग्य जागा शोधण्यास सुरुवात केली.

  • १५० मीटर उंचीवर असलेल्या लँडरचा वेग ६० मीटर प्रति सेकंद होता. म्हणजे ८०० ते १५० मीटर उंचीच्या दरम्यान.

  • ६० मीटर उंचीवर असलेल्या लँडरचा वेग ४० मीटर प्रति सेकंद होता. म्हणजे १५० ते ६० मीटर उंचीच्या दरम्यान.

  • १० मीटर उंचीवर असलेल्या लँडरचा वेग १० मीटर प्रति सेकंद होता.

  • चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताना सॉफ्ट लँडिंगसाठी लँडरचा वेग १.६८ मीटर प्रति सेकंद होता.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-३ ची लँडिंग

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (Moon South Pole) चांद्रयान-३ ची यशस्वी लँडिंग झाली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सतत सावली असते. या भागात सूर्य किरण पोहोतच नाहीत. या भागात Moon Ice आणि पाणी मिळण्याची शक्यता सांगितली जातेय.

या भागात पाणी असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केलीये. या भागात १३ किलोमीटर पर्यंत Crater आहेत. Crater म्हणजे चंद्रावरचे खड्डे. चंद्रावर अनेक प्रकारचे धुमकेतू आदळून हे खड्डे तयार होता. या खड्ड्यांमुळे आकाशगंगेचा इतिहास शोधण्यास मदत होणार आहे.  (Latest News Update)

यापूर्वी इस्राने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान पाठवलं होतं. पण त्यांना यात अपयश आलं. दक्षिण ध्रुवावर तापमान हे उणे २०० डीग्री असतं. या भागात मनुष्याने पाठवलेले मशीन्स खराब होतात. नुकतंच रशियानेही चंद्रावर आपलं यान पाठवलं होतं. पण ते फेल झालं. अशा वेळी संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे लागलं होतं. अशातच भारताने आज इतिहास रचला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT