Netanyahu Faces  
देश विदेश

बेंजामिन नेतान्याहू यांना ट्यूमर; इराणसोबतच्या हाय-व्होल्टेज चर्चेआधी पंतप्रधानांचा मेडिकल रिपोर्ट समोर; जगभरात खळबळ

Benjamin Netanyahu latest update : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या मेडिकल रिपोर्टमध्ये ट्यूमर आढळल्याची माहिती समोर आली आहे. इराणसोबतच्या महत्त्वाच्या चर्चेपूर्वी ही बातमी समोर आल्याने जागतिक स्तरावर खळबळ उडाली आहे.

Namdeo Kumbhar

Benjamin Netanyahu Health Update : इराण आणि अमेरिकेमध्ये हाय-व्होल्टेज चर्चा होणार आहे, परंतु त्याआधीच इस्रायलमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या मेडिकल रिपोर्टमध्ये त्यांना 'ट्यूमर' असल्याचं निदान झालं आहे. एकीकडे इराणसोबतच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे तणाव वाढला आहे, तर दुसरीकडे पंतप्रधानांचे आजारपण; यामुळे इस्रायलमध्ये आणि तेथील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ही बातमी आता जागतिक चिंतेचा विषय ठरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इराण आणि अमेरिका यांच्या प्रतिनिधींमध्ये होणाऱ्या महत्त्वपूर्ण चर्चेच्या काही तास आधीच नेतान्याहू यांचा मेडिकल रिपोर्ट सार्वजनिक करण्यात आला आहे. यामध्ये त्यांना ट्यूमर झाल्याचं स्पष्ट झालं आहे. नेतान्याहू यांनी आपला वैद्यकीय अहवाल प्रसिद्ध करून जगाला धक्का दिला आहे. ते मागील काही काळापासून आरोग्याच्या समस्येशी झुंज देत होते, परंतु आता ते पूर्णपणे निरोगी आणि तंदुरुस्त आहेत, अशी माहिती नेतान्याहू यांनी दिल्याचं स्थानिक मीडियाने सांगितलं.

आपल्या मेडिकल रिपोर्टवर बेंजामिन नेतान्याहू यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, "त्यांनी हा अहवाल सार्वजनिक करण्यास दोन महिन्यांचा विलंब करण्याची विनंती केली होती. तो ऐन युद्धाच्या काळात प्रसिद्ध करायचा नव्हता, कारण त्याचा गैरवापर झाला असता." नेतान्याहू यांनी मेडिकल रिपोर्ट शेअर करताना ३ महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.

पहिली गोष्ट म्हणजे, देवाच्या कृपेने ते पूर्णपणे निरोगी आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे, त्यांची शारीरिक स्थिती उत्तम आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे, त्यांना प्रोस्टेटशी संबंधित एक किरकोळ वैद्यकीय समस्या होती, ज्यावर आता पूर्णपणे उपचार झाले आहेत. नेतान्याहू म्हणाले की, दीड वर्षांपूर्वी वाढलेल्या सौम्य प्रोस्टेटवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली होती, तेव्हापासून ते नियमित तपासणी करून घेत आहेत. मागील तपासणीदरम्यान प्रोस्टेटमध्ये एक खूप लहान गाठ (ट्यूमर) आढळली होती. ही सुरुवातीच्या टप्प्यातील घातक गाठ होती, मात्र सुदैवाने ती मोठ्या प्रमाणात वाढली नव्हती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2027 आधीच वाढणार पगार? मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: जालन्यात ठाकरेंची शिवसेना आक्रमक, फुटलेल्या सहा खासदारांविरोधात भीक मांगो आंदोलन

Maharashtra Politics : राष्ट्रवादीच्या नेत्याचं नगराध्यक्षपद जाणार, नेमकं काय कारण?

लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये टाका हे 3 पदार्थ; मुंग्या आणि झुरळे मिनिटांत होतील गायब

मुंबई लोकलमध्ये थरारनाट्य! दरवाजा बंद करण्यावरून चाकूने वार, संपूर्ण डब्ब्यात रक्तच रक्त; अंगावर काटा आणणारा Video

SCROLL FOR NEXT