Operation Ajay Saam Tv
देश विदेश

Operation Ajay: इस्रायल-हमास युद्धादरम्यान भारताचे 'ऑपरेशन अजय', 918 भारतीय देशात परतले

Israel-Palestine war: इस्रायल-हमास युद्धादरम्यान भारताचे 'ऑपरेशन अजय', 918 भारतीय देशात परतले

Satish Kengar

Israel-Palestine war:

इस्रायल आणि हमासमध्ये भीषण युद्ध सुरु आहे. यामध्ये अनेक भारतीय नागरिक त्या ठिकाणी अडकले आहेत. यातच आज तेल अवीवमधून एकूण 471 भारतीयांना घेऊन दोन उड्डाणे रविवारी सकाळी दिल्लीत पोहोचले. यातील एक विमान एअर इंडियाचे तर दुसरे विमान स्पाइस जेटचे होते.

केंद्र सरकारच्या वतीने ऑपरेशन अजय अंतर्गत एकूण चार उड्डाणे संचालित करण्यात आले. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायलमधून परत येऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी सरकारने ही मोहीम सुरू केली आहे. आतापर्यंत 918 भारतीय इस्रायलमधून परतले आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी रविवारी सांगितले की, 197 प्रवाशांना घेऊन तिसरे विमान सकाळी दिल्ली विमानतळावर उतरले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरील आपल्या पोस्टमध्ये त्यांनी सांगितले की, 274 प्रवाशांना घेऊन चौथे विमान दिल्ली येथे पोहोचले. (Latest Marathi News)

त्यांनी प्रवाशांचे फोटोही शेअर केले. एअर इंडियाद्वारे संचालित दोन चार्टर्ड उड्डाणे तेल अवीव येथून शुक्रवारी आणि शनिवारी एकूण 435 हून अधिक प्रवाशांना घेऊन आली. गाझामध्ये इस्रायलचे हल्ले सुरूच आहेत. इस्रायलने गाझामध्ये ग्राउंड ऑपरेशनही सुरू केले आहे.

ओलिसांची सुटका करण्यासाठी आणि दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी इस्रायल गाझामध्ये ऑपरेशन सुरु केलं आहे. दरम्यान, हिजबुल्लाहनेही हमासला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. या युद्धात भारताचे ऑपरेशन अजय सुरूच आहे. इस्रायलमधून परतलेल्या लोकांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Police Transfer : मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या, कारण काय?

Maharashtra Live News Update: भरधाव अनियंत्रित चारचाकी कारने चार जणांना उडवले.अमरावती शहरातील मोती नगर मधील धक्कादायक घटना

Hair Care: तुमच्या केसांसाठी कोणता शॅम्पू आहे परफेक्ट, एकदा जाणून घ्या

पतीशी भांडण, पोलिसाशी अफेअर, शरीरसंबंध अन् हत्या; आरोपीचा खरा चेहरा 'असा' समोर आला

Palak Pakoda Recipe: थंडीत संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा स्ट्रीट स्टाईल पालक भजी, ही आहे सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT