भरत मोहोळकर, साम टीव्ही प्रतिनिधी
इराणच्या मिसाईल हल्ल्यांनी संतापलेल्या इस्रायलने आता थेट इराणमध्ये विध्वंस निर्माण करण्यासाठी योजना आखलीय.. त्यामुळे इस्त्राईलच्या निशाण्यावर इराणच्या अणुभट्ट्या असल्याची चर्चा रंगलीय. मात्र अणुभट्ट्यांना लक्ष करणं शक्य आहे का? त्याबरोबरच इराण-इस्त्राईल विध्वंसावरचा हा स्पेशल रिपोर्ट.....
लेबनानच्या हसन नसरल्लाच्या हत्येनंतर इराण खवळलाय...इराणने इस्त्राईलवर हल्ले वाढवल्याने आता त्याला जशाच तसं उत्तर देण्यासाठी इस्त्रायलने प्लान आखलाय...इस्त्राईलचे पंतप्रधान बेंझामिन नेत्यान्याहूंनी इराणला थेट विध्वंसक हल्ल्यांचाच इशारा दिलाय...इराणच्या अणूभट्ट्याच उडवण्याचा प्लान इस्त्रायलने ठरल्याची चर्चा जोरात सुरूये...
तेहराण न्युक्लियर सेंटर आणि रिसर्च लॅब
बोनाब न्युक्लियर सेंटर रिसर्च लॅब
एस्पहान न्युक्लियर सेंटर
फोर्दो न्युक्लियर सेंटर (अणुबॉम्ब निर्मिती प्लँट)
नतांज न्युक्लियर सेंटर (टिटोनियम प्लँट)
इराणच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी इस्त्राईलने IDF ट्रुथफूल प्रॉमिस 2 लाँच करण्याची रणनिती आखलीय...यात इराणच्या अणूभट्ट्या टार्गेटवर आहेत...मात्र इस्त्रायलने जरी हा प्लान तयार केला असला तरी इराणच्या अणुभट्ट्या उद्ध्वस्त करणं इस्त्राईलसाठी सोपे नाही...याची काय कारणं आहेत पाहुयात...
इराणच्या अणुभट्ट्या डोंगराळ भागात आणि भूमिगत असल्याने स्फोटक निरुपयोगी
अणुभट्ट्या इस्त्राईली एअरबेसपासून 2 हजार किमी दूर
अणुभट्ट्यांपर्यंत पोहचण्यासाठी इंधन अडथळा ठरणार
इराणपर्यंत पोहचण्यासाठी सौदी आणि इराकच्या हवाई हद्दीतून जावं लागणार
इराणच्या अणुभट्ट्यांचा देशभरात विस्तार असल्याने उद्ध्वस्त करणं अशक्य
इराणच्या एअर डिफेन्स ठिकाणांवर हल्ले शक्य
इराणच्या अणुभट्ट्यांना टार्गेट करण्यास अमेरिकेचा विरोध
इराणच्या अणू कार्यक्रमाने जगाचं टेंशन वाढवलंय.. त्यापार्श्वभूमीवर जर इस्त्राईल विध्वंसक हल्ले करण्यासाठी IFD ऑपरेशन ट्रुथफुल प्रॉमिस लाँच करण्याच्या तयारीत आहे. तर या पार्श्वभूमीवर इस्त्राईलचे फायटर जेट्स फारस खाडीवर घोंगावायला सुरुवात झालीय. तर इराणची एअर डिफेन्स सिस्टीमही रेडी टू अटॅक मोडवर आहे. त्यामुळे इस्त्राईलने इराणच्या अणूभट्ट्यांना निशाणा बनवल्यास युद्धाची आगीत संपूर्ण जग होरपळल्याशिवाय राहणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.