इस्राइल आणि हमास यांच्यातील संघर्षाचे परिणाम हळूहळू जगावर होऊ लागले आहे. भारतावरही या युद्धाचे परिणाम होताना दिसत आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यात यांच्यातील युद्ध चिघळलं आणि पश्चिम आशियापर्यंत पोहोचलं तर कच्च्या तेलाच्या किमती वाढणे निश्चित आहे. कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावरही याचा परिणाम होऊ शकतो.
इस्रायल-हमास यांच्यातील युद्ध पश्चिम आशियामध्ये पसरले तर त्याचा परिणाम अवघ्या जगावर होऊ शकतो, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. इतर अनेक देशही युद्धात उडी घेऊ शकतात.
यामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्याबाबत जगाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. पेट्रोलियम निर्यातदार आणि इतर तेल उत्पादक देशांची संघटना ओपेक प्लसने तेलाच्या पुरवठ्यात कपात केल्याने कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. (Latest News)
जिओ पॉलिटिकल दृष्टीने विचार केला तर या युद्धाचे जागतिक अर्थव्यवस्थेवरही परिणाम होऊ शकतात. महागाई व्यतिरिक्त जागतिक बाजारपेठेत अस्थिरतेची स्थिती निर्माण होऊ शकते. युद्धामुळेही मंदी येऊ शकते.
ज्याचा थेट परिणाम भारतीय रुपयावर होऊ शकतो. भारताचा इस्रायलसोबत सध्या १० अब्ज डॉलरचा व्यापार आहे. चालू वर्षात इस्रायलमधून भारतात 8.5 डॉलरची निर्यात झाली आहे. तर 2.3 अब्ज डॉलर्सची आयात झाला आहे. युद्धामुळे सोन्याच्या दरातही वाढ होताना दिसत आहे.
इस्राइल-हमास युद्धाचे परिणाम भारतीय शेअर बाजारावर देखील झाले आहे. आठवड्यांच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात पडझड झालेली पाहायला मिळाली. शेअर बाजारात सुरुवातील गुंतवणूकदारांचं जवळपास 4 लाख कोटींचं नुकसान झालं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.