Israel Hamas War Latest News  Saam TV
देश विदेश

Israel-Hamas ceasefire : १५ महिन्यानंतर संघर्ष थांबला, हमास-इस्रायल यांच्यात युद्धविराम, कुणी केली मध्यस्थी?

Israel-Hamas Ceasefire News : ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये युद्धाला सुरूवात झाली होती. यामध्ये आतापर्यत हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. अखेर युद्धविरामावर दोन्ही देशांनी स्वक्षरी केली आहे.

Namdeo Kumbhar

Gaza war end : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अखेर थांबले आहे. मंगळवारी दोन्ही देशांनी युद्धविरामाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. दोन्ही देशाकडे असणाऱ्या कैद्यांना सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दोन्ही देशांमध्ये १५ महिन्यांपासून युद्ध (Israel Hamas War Latest News) सुरू होतं. हे युद्ध थांबवण्यासाठी दोन्ही देशाने सहमती दर्शवली असून स्वाक्षरी केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्वीट करत युद्ध थांबल्याची माहिती दिली.

युद्ध थांबल्यानंतर हमास गाझामध्ये बंदी असणाऱ्या इस्रायली नागरिकांची सुटका करण्यात येईल, त्या बदल्यात इस्रायल हमासच्या लोकांनाही सोडणार आहे. पहिल्या टप्प्यात हमास इस्राइलच्या ३३ कैद्यांची सुटका करेल, तर इस्रायल २५० पॅलेस्टिनी कैद्यांना सोडणार आहे. १५ दिवसानंतर हमास उर्वरित कैद्यांची सुटका करणार आहे.

दोन्ही देशांमध्ये मागील १५ महिन्यापासून युद्ध सुरू होतं. हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. त्या हल्ल्यात १२०० नागरीक आणि सैनिकांची हत्या केली होती आणि २५० पेक्षा जास्त लोकांना ओलीस ठेवले होते. त्यानंतर इस्रायलने गाझामध्ये केलेल्या हल्ल्यात ४६ हजारांपेक्षा जास्त पॅलेस्टिनी ठार झाले. त्यामध्ये महिला आणि मुलांची संख्या सर्वाधिक होती.

कोणत्या मुद्द्यावर करार झाला?

हजारो विस्थापित गाझा रहिवाशांना इस्रायल सोडेल.

हमासने ओलीस ठेवलेल्या डझनभर लोकांची हळूहळू सुटका करावी

इस्रायल पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करावी.

डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती -

हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धविरामाची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डानाल्ड ट्रम्प यांनी दिली. सोशल मिडिया पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय की, आम्ही मध्यपूर्वेतील ओलिसांसाठी करार केला आहे. त्याला लवकरच सोडण्यात येणार आहे. धन्यवाद! IDF (इस्रायल डिफेन्स फोर्स) ने ओलिसांच्या परत येण्याला 'विंग्स ऑफ फ्रीडम' असे नाव दिले आहे.

कुणामुळे युद्ध थांबले? Qatar PM confirms Israel-Hamas reach Gaza ceasefire, hostage deal

कतारचे पंतप्रधान यांच्या मध्यस्थीमुळे हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धाला पुर्णविराम लागलाय. कतारच्या पंतप्रधानांनी गाझामध्ये 15 महिन्यांपासून सुरू असलेले विनाशकारी युद्ध संपविण्याची घोषणा केली आहे. अनेक इस्रायली ओलीसांच्या सुटकेसाठी इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धविराम कराराची घोषणाही त्यांनी केली. शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी असे कतारच्या पंतप्रधानांचे नाव आहे. शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल सानी यांच्यामुळे १५ महिन्यांपासून सुरू असलेले युद्धाला पूर्णविराम मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

SCROLL FOR NEXT