Rahul Navin ED Director Saam Tv
देश विदेश

ED New Director: IRS अधिकारी राहुल नवीन यांची ED च्या संचालकपदी नियुक्ती, किती वर्षांचा असेल कार्यकाळ? जाणून घ्या

Rahul Navin ED Director: आयआरएस अधिकारी राहुल नवीन यांची अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) संचालकपदी नियुक्ती.

Satish Kengar

केंद्र सरकारने बुधवारी 1993 बॅचचे आयआरएस अधिकारी राहुल नवीन यांची अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) संचालकपदी नियुक्ती केली. माजी संचालक संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये संपल्यानंतर राहुल नवीन यांनी अंमलबजावणी संचालनालयाचे प्रभारी संचालक म्हणून पदभार स्वीकारला होता.

केंद्र सरकारने 14 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या परिपत्रकात राहुल नवीन यांच्या नियुक्तीची माहिती दिली. या परिपत्रकानुसार, "मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने राहुल नवीन यांची अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) संचालकपदी नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांचा असेल.''

नवीन यांची नोव्हेंबर 2019 मध्ये ईडीचे विशेष संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नवीन यांच्या अंतरिम ईडी प्रमुखाच्या कार्यकाळात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना वेगवेगळ्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती.

संजय कुमार मिश्रा यांना ईडीचे संचालक म्हणून वारंवार देण्यात आलेली मुदतवाढ सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली होती. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला ताशेरे ओढले होते आणि सध्याचे प्रमुख वगळता संपूर्ण विभागात या पदासाठी कोणीही सक्षम अधिकारी नाही का, अशी विचारणा केली होती. यानंतर आता नवीन यांची ईडीच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कोण आहेत राहुल नवीन?

मूळचे बिहारमधील बेतिया जिल्ह्यातील राहुल नवीन हे गेल्या काही महिन्यांपासून ईडीच्या संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत होते. मात्र आता त्यांच्याकडे संचालकपदाचा संपूर्ण कार्यभार सोपवण्यात आला आहे. राहुल नवीन हे 1993 च्या बॅचचे भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Rekha : ७१ व्या वर्षी तरुणींना लाजवेल असं सौंदर्य, रेखा यांच्या लांबसडक केसामागचं रहस्य काय?

कर्तव्य बजावत असताना साताऱ्यातील जवानाचा मृत्यू; चंदीगडमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन

Maharashtra Live News Update: मेगा ब्लॉकमुळे 'मुंबई-सोलापूर-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस' रद्द

Mumbai : एसआरए इमारतीत BMC कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला, मुंबईत धक्कादायक घटना

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्याच्या वाळू धोरणात मोठे बदल, घरकुल योजनेसाठी १० टक्के वाळू मोफत मिळणार

SCROLL FOR NEXT