तेहरान ते तेल अवीव... युद्धाची ठिणगी आता वणवा बनलीय! इराणनं असा मास्टरप्लॅन तयार केलाय की व्हाईट हाऊसपासून मोसादच्या हेडक्वार्टरपर्यंत सर्वांची झोप उडालीय.अयातुल्ला खामेनींच्या हत्येनंतर इराण संपला असं वाटणाऱ्यांना आता इराणचा नवा उत्तराधिकारी 'मोजताबा'नं मोठा धक्का दिलाय. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स'नं 'खामेनीचा फॉम्युला 3' समोर आणलाय.. अमेरिकेसह इस्त्रायलला उद्धवस्त करण्यासाठी इराणनं मृत्यूचं चक्रव्य़ूह कसं रचलयं... पाहूयात......
इराणी लष्कराच्या प्रत्येक महत्त्वाच्या कमांडरमागे 3 उत्तराधिकाऱ्यांची नेमणूक
युद्धात एका कमांडरचा मृत्यू झाला तर दुसरा कमांडर तात्काळ त्याची जागा घेणार
दुसऱ्याचा मृत्यू झाल्यास तिसरा कमांडर युद्धासाठी सज्ज राहणार
य़ामुळे इराणची लष्करी फळी कधीही नेतृत्वहीन होणार नाही, अशी मुख्य रणनीती इराणनं आखलीय...
युद्ध कायम सुरु ठेवण्यासाठी आणि इस्रायल- अमेरिकेला नाकीनऊ आणण्यासाठी ही रणनीती महत्त्वाची आहे...
मोजताबाला उत्तराधिकारी घोषित केल्यानंतर इराणी लष्करानं घेतलेला हा निर्णय महायुद्धाला आमंत्रण देणारा आहे...
दरम्यान ट्रम्प यांनी इराणसोबत वाटाघाटी करण्यात नकार दिलाय... तर इराणही प्रत्युत्तरासाठी सज्ज झालंय...इराणी सैन्य मजबूत असून शत्रू देशाचं नामोनिशाण मिटवू, असा इशारा इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी दिलाय.. त्यामुळे एकीकडे इराण महायुद्धात पूर्ण तयारीनिशी उतरणार असताना दुसरीकडे फॉर्म्युला 3 मुळे इराणची नवी लष्करी फळी मोडून काढणं इस्रायलसाठी मोठं आव्हान असेल... आता इराणनं- अमेरिका, इस्त्रायलविरोधात महायुद्ध छेडलं तर युद्धाचा हा वणवा कधी थांबणार, हे सांगणं अशक्य होईल.. ..
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.