Shreya Maskar
देवघळी बीचला 'कशेळी बीच' म्हणूनही ओळखले जाते. हा रत्नागिरी जिल्ह्यातील कशेळी या दुर्गम गावात स्थित आहे.
देवघळी बीच आश्चर्यकारक चंद्रकोर आकारासाठी प्रसिद्ध आहे. देवघळी बीचवरून निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
कशेळी समुद्रकिनाऱ्यावरून सूर्योदय आणि सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. येथील सौंदर्य काळजात घर करून राहते.
शहराच्या धावपळीपासून दूर असलेल्या या ठिकाणी स्वच्छ निळेशार पाणी आणि खडकाळ कडे पाहायला मिळतात. हे एक शांत आणि निवांत ठिकाण आहे.
देवघळी बीचच्या परिसरात प्रसिद्ध श्री कनकादित्य मंदिर आहे. येथे तुम्हाला शांत आणि मंगलमय वातावरण अनुभवायला मिळते.
देवघळी समुद्रकिनारा पावसाळ्यात हिरव्यागार नंदनवनात रूपांतरित होतो. ओल्या वाळूतून चालण्याची मज्जाच काही और आहे.
तारकर्ली बीच, गणपतीपुळे बीच, भोगवे बीच, अंजर्ले बीच, हेदवी बीच, वेळणेश्वर बीच
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.