Iran Israel ceasefire x
देश विदेश

Iran-Israel War : मोहरमनंतर पुन्हा युद्ध! इराण-इस्रायल युद्ध पेटणार

Iran Israel ceasefire : मोहरमनंतर जगाचं टेन्शन पुन्हा वाढणारेय. कारण पुन्हा एकदा इराण आणि इस्रायलचं युद्ध आता अवघ्या काही दिवसांवर आल्याचं दिसतंय. इराणच्या नाक्यानाक्यावर लब्बैक हुसैनच्या आरोळ्या इराणी जनतेनं ठोकल्यानं जगाचं टेन्शन वाढलंय.

Yash Shirke

इस्लामिक नववर्षाच्या पहिल्या महिन्यात जगात रक्ताचे पाट वाहतील अशी परिस्थिती आहे कारण इराण मोहरमची वाट पाहतोय, एकदा का मोहरम संपला की पुन्हा इस्रायलसोबत इराण युद्धाचं बिगुल फुंकणारेय. पैगंबर मोहम्मद यांचे नातू इमाम हुसैन अन्यायाविरोधात लढतांना करबालाच्या युद्धात शहिद झाले. त्यांच्या बलिदानामुळे मोहरम हा महिना शौर्य, त्याग आणि तत्वनिष्ठेची आठवण करुन देणारा महिना. हाच महिना संपल्यानंतर इराण पुन्हा इस्रायल विरोधात रणांगणात उतरणारेय. इराणी सैन्याचे प्रवक्ते अबुल फजलनं काय म्हटलंय, पाहुया..

- मोहरमनंतर पुन्हा युद्ध पेटणार ?

- सध्या अमेरिकेसोबत चर्चेला वेळ लागेल

- इराणचा अणु कार्यक्रम लगेच सुरू होऊ शकतो

- इराण लवकरच युरेनियम संवर्धनाची प्रक्रिया पुन्हा सुरु करणार

- अमेरिकेनं हल्ला न करण्याचं जाहिर केलं तेव्हाच चर्चा होईल

ईराणने आपला अणु कार्यक्रम पुढे सुरू ठेवला, तर त्याच्यावर पुन्हा हल्ला करण्यात येईल असा इशारा अमेरिका वारंवार देत आलीय.

करबला युद्धात इमाम हुसैन यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या शहादतीनंतरही "कोण आहे जो मदत करेल?" अशी साद घातली होती आणि गेल्या १४०० वर्षांपासून विशेषतः शिया समाज या सादेला आपली जबाबदारी मानतो. याच आधारावर या युद्धालाही इराण कडून धर्मयुद्ध म्हणत लढण्यात आलं. त्यामुळे सध्या लब्बैक हुसैन म्हणजेच मै यहा हू. हे हुसैन या आरोळ्या इराणच्या गल्लीगल्लीत, नाक्या नाक्यावर ऐकायला मिळतायेत. त्यामुळे इराणनं अमेरिका आणि इस्रायलला पुन्हा चालून आलात तर मार खाऊन जाल असाच इशारा दिलाय. मात्र यामुळे जगाचं टेन्शन मात्र कायम राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विरारमध्ये डंपर खाली चिरडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

SCROLL FOR NEXT