oil impact saam tv
देश विदेश

Iran Israel war : तेलाचा खेळ बदलला! रशियाचा वाटा घटला, आता भारताला इंधन कुठून मिळणार?

Iran Israel war oil impact : इराण-इस्रायल युद्धामुळे जागतिक तेल बाजारात मोठी उलथापालथ झाली आहे. होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे भारताच्या तेल आयातीवर परिणाम झाला. कच्च्या तेलाच्या किंमती १०० डॉलरच्या पुढे गेल्याने पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता आहे.

Namdeo Kumbhar

impact of Iran Israel war on India oil imports : अमेरिका-इस्त्राइल आणि इराण युद्धामुळे जागतिक तेल बाजारात भूकंप आला आहे. याचा परिणाम भारतावरही होत असल्याचे चिन्हे आहेत. भारतामध्ये गॅसचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होत असल्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासह प्रमुख शहरात गॅस सिलिंडरचा तुटवडा आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर वापरावर निर्बंध लावण्यात आलेत. तर घरगुती गॅस बुकिंगसाठीची २५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. भारताच्या तेल आयातीवर मोठा परिणाम झालाय. भारत कोणत्या देशातकडून किती तेल आयात करतो? गेल्या वर्षीच्या तुलनेत २०२६ मध्ये काय फरक झालाय? याबाबतची आकडेवारी जाणून घेऊयात...

रशिया-युक्रेन पाठोपाठ आता मध्यपूर्वेतील (इराण-इस्रायल) तणावामुळे भारताच्या तेल आयात धोरणात मोठे बदल झाले आहेत. भारत रशियाकडून सर्वाधिक तेल आयात करतो. पण गेल्यावर्षीच्या तुलनेत यामध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त कपात झाली आहे. रशियाचा हिस्सा एका वर्षापूर्वी ३६% वरून २०% पेक्षा कमी झाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत भारताने रशियाकडून होणाऱ्या तेल आयातीत लक्षणीय घट झाली आहे. अमेरिकेने रशियन तेल कंपन्यांवर लादलेले निर्बंध आणि बदलत्या जागतिक समीकरणांमुळे जानेवारी २०२६ पर्यंत रशियाकडून भारत घेत असलेला वाटा १९.३% वर आला आहे.

पाहा भारत कोणत्या देशाकडून किती तेल आयात करतो?

Iran Israel war oil impact

इराण आणि इस्रायल यांच्यात मागील १० दिवसांपासून युद्ध सुरू आहे. त्यामुळे 'होर्मुझची सामुद्रधुनी' (Strait of Hormuz) हा महत्त्वाचा सागरी मार्ग बंद कऱण्यात आला आहे. त्याचा फटका भारताला बसला आहे. कारण, भारत याच मार्गावरून जवळपास ५५ टक्के तेल आयात करतो. पण हा मार्ग बंद झाल्यामुळे सौदी अरेबिया, इराक आणि युएई कडून येणाऱ्या तेलाचा पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे भारतावर मोठं संकट उभारले आहे.

तर पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढणार -

भारताने देशातील तेल साठा नियमित ठेवण्यासाठी आपल्या रणनीतीमध्ये बदल केला आहे. सध्याच्या स्थितीला भारत अमेरिका आणि आफ्रिकी देशातून तेल खरेदी वाढवली आहे. त्यामुळे अमेरिकेचा भारताच्या तेल आयातीतील हिस्सा आता ६.८% पर्यंत पोहोचला आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाच्या स्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम क्रूड आईलच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरेल १०० डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमती अशाच वाढत राहिल्या, तर आगामी काळात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होऊन महागाई वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा समोर; ७१ लाख महिलांचा ₹१५००चा लाभ कायमचा बंद

फ्रिजमध्ये या 5 वस्तू कधीच ठेवू नका

Famous Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, सिनेसृष्टीवर शोककळा

MHADA lottery : म्हाडाकडून बंपर लॉटरी, मुंबईमध्ये फक्त २९ लाखांत घर, वाचा A टू Z माहिती

Strawberry Chutney Recipe : घरीच बनवा आंबट-गोड स्ट्रॉबेरी चटणी, चव अशी की पुन्हा पुन्हा खावंसं वाटंल

SCROLL FOR NEXT