इराणमध्ये कोरोनाचा विस्फोट; दर दोन मिनिटाला एक मृत्यू Saam Tv
देश विदेश

इराणमध्ये कोरोनाचा विस्फोट; दर दोन मिनिटाला एक मृत्यू

इराणमध्ये (Iran) संसर्गाच्या पाचव्या (Coronavirus Fifth Wave) आणि सर्वात मोठ्या लाटेने देशभरात कहर केला आहे.

वृत्तसंस्था

इराणमध्ये (Iran) संसर्गाच्या पाचव्या (Coronavirus Fifth Wave) आणि सर्वात मोठ्या लाटेने देशभरात कहर केला आहे. देशात लसीच्या तीव्र कमतरतेमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढला आहे. इराणमधील सर्व रुग्णालये भरलेली आहेत यावरून याचा अंदाज लावला जाऊ शकतो. परिस्थिती एवढी भिषण आहे की रूग्णांना रुग्णालयाच्या मजल्यावर आणि पार्किंगवर उपचार करावे लागत आहे. खाटांच्या कमतरतेमुळे नातेवाईक रुग्णालयाबाहेर खाजगी वाहने उभी करून रुग्णांवर उपचार घेत आहेत. देशात ऑक्सिजनच्या तीव्र कमतरतेमुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे.

देशात एक आठवडा लॉकडाऊन

इराणमध्ये कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता देशात आठवडाभर लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. इराणमध्ये एका दिवसात सापडलेल्या नवीन रुग्णांची संख्या 40 हजारांच्या पुढे गेली आहे. एका दिवसात विक्रमी 600 मृत्यू होत आहेत. एका अहवालात दावा करण्यात आला आहे की 8.30 कोटी लोकसंख्या असलेल्या इराणमध्ये कोरोनामुळे दर दोन मिनिटांनी एक मृत्यू होत आहे. डॉक्टर, परिचारिका आणि इतर वैद्यकीय कर्मचारी आतापर्यंतच्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहेत.

आतापर्यंत इराणमध्ये 43.90 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद

इराणच्या आरोग्य मंत्रालयाच्या मते, कोरोनाच्या डेल्टा प्रकारामुळे रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आतापर्यंत इराणमध्ये 43.90 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. 97,200 हून अधिक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या एक आठवड्यापासून दररोज 39 हजार ते 40,800 नवीन रुग्ण आढळले आहेत, तर 37 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. तेहरानच्या विषाणू टास्क फोर्सचे उपप्रमुख नादिर तवाकोली म्हणाले की, कोरोनाची पाचवी लाट किती नासधूस करेल याचा आम्ही अंदाज लावू शकत नाही.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

Latur Tourism : पावसाळ्यात हिरवळ, धबधबा आणि शांतता हवीय? मग सहस्त्रकुंड नक्की पाहा

MNS- Shivsena: झाली युती झाली...; राज- उद्धव ठाकरे भेटीनंतर भास्कर जाधवांचं मोठं विधान, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT