Iran displays its missile and drone capabilities as tensions rise with the United States and Israel in the Middle East. Saam Tv
देश विदेश

इराण-अमेरिका युद्ध सहा महिने चालणार? युद्धासाठी इराणचा मास्टरप्लॅन काय?

Iran’s 6-Month War Strategy: इस्त्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देणाऱ्या इराणनं आता नवा मास्टरप्लॅन आखलाय... इराणनं तब्बल 6 महिने शत्रूशी युद्ध करण्यासाठी कशी तयारी केलीय... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

इराणच्या इशाऱ्यानं वॉशिंग्टनपासून तेल अवीवपर्यंत एकच खळबळ माजलीय..इराणची सर्वात शक्तिशाली लष्करी तुकडी म्हणजेच IRGC ने अमेरिकेला उघड आव्हान दिलंय. एकीकडे इस्त्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणच्या लष्करानं तोडीस तोड प्रत्युत्तर दिलेलं असताना दुसरीकडे इराणनं शत्रूला काय आव्हानं दिलयं... पाहूयात...

इराणनं आखाती प्रदेशातील अमेरिकन आणि इस्रायली लष्करी सुविधांशी संबंधित 200 हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केलंय. त्यामुळे सलग 6 महिने लष्करी मोहिमा राबवण्याची क्षमता इराणकडे असल्याची धमकी रिव्होल्युशनरी गार्ड्सचे प्रवक्ते अली मोहम्मद नैनी यांनी दिलीय...

इराणने गेल्या काही वर्षांत स्वदेशी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा तयार केलाय.. त्यामुळे कोणत्या शस्त्रांच्या मदतीनं इराण 6 महिने युद्ध लढणार आहे? पाहूयात...

1) शॉर्ट-रेंज बॅलिस्टिक मिसाईल

मारक क्षमता अंदाजे 150 ते 800 किमी

मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांमध्ये फतेह, झोल्फाघर, शाहाब 1/2 चा समावेश

ही क्षेपणास्त्रे एकाच वेळी जवळच्या लष्करी तळांवर हल्ला करण्यास सक्षम

2) मिड- रेंज बॅलिस्टिक मिसाईल

मारक क्षमता अंदाजे 1500 ते 2000 किमी

शाहाब- 3, इमाद, 'खोर्रमशहर' आणि 'सेज्जिल' चा समावेश

या क्षेपणास्त्रांमुळे इस्रायल, कतार , बहरीन, कुवेत, सौदी अरेबिया आणि युएईमधील अमेरिकन तळ थेट इराणच्या टप्प्यात

सेज्जिल हे घन-इंधनावर चालणारे क्षेपणास्त्र युद्धात शत्रूला जलद प्रत्युत्तर देण्यास सक्षम

3) क्रूझ मिसाईल

इराणकडे सौमार, या-अली, पावेह आणि हौवेजेह ही क्रूझ मिसाईल आहेत

सौमार क्रूझ मिसाईलची मारक क्षमता तब्बल 2500 किमी

क्रूझ मिसाईल जमिनीपासून 50 मीटर उंचीवर शत्रूवर हल्ला करतात

या मिसाईला रडारवर शोधणे आणि ट्रॅक करणे हवाई संरक्षण यंत्रणेसाठी कठीण

4) वन-वे अटॅक ड्रोन

शत्रूची हवाई संरक्षण यंत्रणा उद्धवस्त करण्यास सक्षम

दुसरीकडे इराणला शऱणागती पत्करण्यासाठी बलाढ्य अमेरिका आकाश-पाताळ एक करतंय. अशातच युद्धाची पुढची रणनीती ठरवण्यासाठी इस्त्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा झालीय. त्यात नेत्यानाहू यांनी देखील अमेरिकेची री ओढलीय...

अमेरिका-इस्रायल समन्वय कायम राखून इराणवर लष्करी दबाव कायम ठेवणार असल्याचं इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी सांगितलयं...

दरम्यान इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सनं आपली युद्धक्षमता जाहीर करत अमेरिका-इस्रायलला धमकीवजा इशारा दिलाय. या इशाऱ्यामुळं मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यताय. अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील संघर्षामुळे जागतिक स्तरावर याआधीच चिंतेचं वातावरण आहे. दोन्ही बाजूनं एकमेकांवर सातत्यानं दबाव वाढवला जातोय. त्यात इराणला दुबळा समजण्याची चूक दोन्ही देशांसाठी घोडचूक ठरू शकते. येत्या काही दिवसांत हे युद्ध कोणत्या दिशेने जाणार यावर जगाचं अर्थकारणही अवलंबून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये 300 कोटींचा भूखंड घोटाळा, 49 बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल

२४ वर्षीय क्रिकेटपटूने अचानक घेतली निवृत्ती; राजकीय नेत्यांवर केले भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, क्रीडा वर्तुळात खळबळ

उद्धव ठाकरेंची आमदारकी धोक्यात? राजकीय वर्तुळात खळबळ

Malegaon: मालेगावमध्ये तुफान राडा, महिला अन् तरुणांकडून दुकानाची तोडफोड; VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: अजित पवार अपघात प्रकरण : रोहित सिंगची पण चौकशी होणार

SCROLL FOR NEXT