इराणमध्ये भयंकर रस्ते अपघात झाला. पश्चिमी इराणमध्ये इराकी सीमेजवळ बस अपघाताची घटना घडली. या अपघातामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला तर १६ जण गंभीर जखमी झाले आहेत. या बसमधून गॅस रिफायनरीचे कामगार प्रवास करत होते. ही बस या सर्व कामगारांना रिफायनरीच्या दिशेने घेऊन जात होती. अपघाताची ही घटना अब्दनान आणि देहलोरानला जोडणाऱ्या रस्त्यावर घडली.
शनिवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. हा अपघात झाल्यानंतर पोलिसांनी आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात नेमका कसा झाला यामागचे कारण समोर आले नाही. पोलिस सध्या अपघाताचा तपास करत आहेत. या भीषण बस अपघातामध्ये १६ जण गंभीर जखमी झाले आहेत. यामधील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.
अब्दनान काउंटीचे गव्हर्नर बेहजाद नूरमोहम्मदी यांनी शनिवारी रात्री उशिरा सांगितले की, जखमींना उपचारासाठी इलम, देहलोरान, देझफुल आणि अब्दनान येथील रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले आहे. ३२ जवानांचा समावेश असलेली १२ बचाव पथके, ६ रुग्णवाहिका आणि ६ मदत आणि बचाव पथके घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत.
इराणमध्ये अपघाताच्या घटना वाढत चालल्या आहेत. त्यामुळे इराणमधील रस्ते सुरक्षेबाबतची चिंता वाढली आहे. इराणच्या कायदेशीर वैद्यकीय संस्थेने जूनमध्ये प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार मार्चमध्ये संपलेल्या १२ महिन्यांत देशभरात रस्ते अपघातांमध्ये २०,००० जणांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे देशातील रस्ते सुरक्षेबद्दलची चिंता आणखी वाढली असून अधिकारी आता या अपघातामागचे कारण शोधत आहेत. पोलिस सध्या तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.