Sudhakar Pathare Saam
देश विदेश

DCP Officer: कारची ट्रकला जोरदार धडक, मुंबईतील DCP सुधाकर पठारे यांचा जागीच मृत्यू

DCP Officer Sudhakar Pathare Passes Away: मुंबई पोलीस दलातील पोर्ट झोनचे डीसीपी सुधाकर पठारे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. देवदर्शनासाठी जात असताना त्यांच्या कारचा भीषण अपघात घडला.

Bhagyashree Kamble

मुंबई पोलीस दलातील पोर्ट झोनचे डीसीपी सुधाकर पठारे यांचे कार अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. हा अपघात तेलंगणातील श्रीशैलम येथून नागरकुरनूलकडे देवदर्शनासाठी जात असताना घडला. प्रवासादरम्यान, त्यांच्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली, ज्यामुळे कारचा चेंदामेंदा झाला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या अकाली निधनाने कर्तव्यनिष्ठ अधिकारी गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

सुधाकर पठारे हैदराबाद येथे प्रशिक्षणासाठी गेले होते. ते आपल्या नातेवाईकांसह ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. या भीषण अपघातात त्यांच्यासह त्यांच्या नातेवाईकाचाही जागीच मृत्यू झाला आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच तेलंगणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले, तसेच या घटनेची माहिती मुंबई पोलिसांनाही देण्यात आली.

सुधाकर पठारे यांच्याबद्दल माहिती

सुधाकर पठारे हे अहमदनगर जिल्ह्यातील वाळवणे गावचे रहिवासी होते. पठारे यांनी एम.एस्सी आणि एलएलबीपर्यंतचे शिक्षण घेतले. स्पर्धा परिक्षा देत असताना १९९५ साली ते जिल्हा विशेष लेखा परिक्षक झाले. १९९६ साली विक्रीकर अधिकारी, तर, १९९८ साली पोलीस उपअधीक्षक म्हणून करिअरला सुरूवात केली. पठारे यांनी पोलीस उपअधिक्षक म्हणून पंढपूर, कोल्हापूर, अकलूज तसेच राजुरा येथे सेवा बजावली होती.

त्यानंतर अप्पर पोलीस अधिक्षक म्हणून वसई, चंद्रपूर, तर पोलीस अधिक्षक म्हणून सीआयडी अमरावती येथे त्यांनी सेवा बजावली. तसेच पोलीस उपायुक्त म्हणून त्यांनी मुंबई, ठाणे, वाशी, पुणे, नवी मुंबई येथे सेवा बजावली. सुधाकर पठारे यांनी संघटित गुन्हेगारीविरोधात मकोका, तडीपारी, एमपीडीए अंतर्गत कठोरातील कठोर कारवाया केल्या आहेत. तसेच कायदा - सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT