Hyderabad Rape Case
Hyderabad Rape Case Saam TV
देश विदेश

हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणी AIMIM नेत्याच्या मुलाची चौकशी करा; भाजपसह काँग्रेसची मागणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हैदराबाद : हैदराबादमध्ये (Hyderabad) एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणी AIMIM पक्षाच्याआमदाराच्या मुलाची चौकशी करण्यात येत आहे. शिवाय या प्रकरणात राजकीय पक्षांनी देखील उडी घेतली आहे.

सदर घटना हैदराबादमधील जुबली हिल्स परिसरात २८ मे रोजी घडली आहे. पीडितेच्या वडिलांनी या प्रकऱणी तक्रार दाखल केली असून तक्रारीनुसार, आमदाराचा मुलगा इतर काही जणांसह मुलीसोबत बाहेर गेला होता नंतर मुलीला कारमध्ये बसून संध्याकाळी ५.३० वाजता पबमध्ये तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचं तक्रारीत म्हंटलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी कार जप्त केली आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. तक्रारीनुसार, मुलगी २८ मे रोजी ज्युबली हिल्स येथील अॅम्नेशिया अँड इन्सोम्निया पबमध्ये तिच्या मैत्रिणींसोबत पार्टीसाठी गेली होती. त्यावेळी तीला काही लोकांनी लाल रंगाच्या आलिशान कारमध्ये लिफ्ट देण्याची ऑफर दिली. त्यांनी तिच्यासोबत गैरवर्तन केले. यावेळी तिच्या मानेवर जखमा झाल्या असल्याचं तक्रारीत म्हंटलं आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान, या प्रकरणातील आमदाराच्या मुलाला अटक करण्यात यावी आणि त्याच्यासोबत असणाऱ्या इतर ५ आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या तेलंगणा भाजपचे (Telangana BJP) नेते के कृष्ण सागर राव यांनी केली आहे. ते म्हणाले आहेत की, आम्ही पाच गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी करत आहोत. हैदराबाद पोलिसांनी आरोपींची कार जप्त केली मग अरोपींना अटक का केली नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.

शिवाय मुख्यमंत्री केसीआर (CM KCR) किंवा AIMIM प्रमुख ओवेसी यांच्या परवानगीची वाट पाहत आहेत का? एक गुंड एआयएमआयएमच्या आमदाराचा मुलगा आहे आणि दुसरा अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षाचा मुलगा आहे असंही के कृष्ण सागर राव म्हणाले आहेत.

तर सत्ताधारी लोक अशा घटनांमध्ये गुंततात हे जनतेचे दुर्दैव असून कधीतरी जुबली हिल्समध्येच सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या मुलाने कोणाला तरी मारहाण केली आणि नंतर आमदार शांतपणे आरोपपत्रातून आपले नाव काढले होते आणि आता आमदाराच्या मुलाचा अशा गुन्ह्यात सहभाग असल्याचे आपण पाहतो. सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या नेत्यांना पोलिसांचा सॉफ्ट कॉर्नर आहे, मात्र या आरोपींवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी तेलंगणा काँग्रेसचे प्रवक्ते प्रा दासोजू श्रावण यांनी केली आहे.

दरम्यान, सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी अठरा वर्षीय आरोपी सादुद्दिन मलिक याला अटक केली असून आणखी २ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून याप्रकरणी आणखी दोन जणांचा पोलिस शोध घेत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CSK vs PBKS: चेन्नईच्या पराभवाचं नेमकं कारण काय? ऋतुराज गायकवाडने केला खुलासा

Mumbai Court Raps Ed: खटल्याला उशीर झाला, आरोपींनी अधिकची शिक्षा भोगली, ईडीला कोर्टाने फटकारलं

Madha Constituency: झुकणार नाही लढणार! निवडणुकीनंतर अनेक गोष्टींना तोंड देण्याची माझी तयारी; धैर्यशील मोहिते पाटलांचे फडणवीसांना प्रतिआव्हान

Bhabha Hospital News : पेशंटकडून नर्सला मारहाण, कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन

Panchayat 3 Released Date : अखेर ठरलं..., 'पंचायत ३' याच महिन्यात रिलीज होणार; कहाणीत कोणता नवा ट्वीस्ट येणार ?

SCROLL FOR NEXT