Live-in relationship crime  
देश विदेश

Crime : महाराष्ट्राच्या लेकीची भोपाळमध्ये हत्या; प्रियकराने कुटुंबाच्या मदतीने रचला क्रूर कट; लोखंडी पेटीतून बाहेर आलं संतापजनक वास्तव

Bhopal woman murder septic tank case details : इन्स्टाग्रामवर सुरू झालेल्या नात्याचा भयानक शेवट. महाराष्ट्रातील महिलेची भोपाळमध्ये हत्या करून मृतदेह सेप्टिक टँकमध्ये टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघड.

Namdeo Kumbhar

Live-in relationship crime cases : भोपाळमध्ये इन्स्टाग्रामवर सुरू झालेल्या एका प्रेमसंबंधाचा अत्यंत भयंकर शेवट झाला आहे. महाराष्ट्रातील एका ३३ वर्षीय महिलेची भोपाळमध्ये हत्या करून मृतदेह चक्क सेप्टिक टॅंकमध्ये फेकून देण्यात आला. ही संपूर्ण घटना एखाद्या चित्रपटासारखी सुन्न करणारी आहे. मृत महिलेचे नाव आश्रफी उर्फ सिया असे आहे. तर आरोपीचे नाव समीर असे आहे. दोघांची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. पण या प्रेमाचा भयनक शेवट झाला. समीरने सियाचा गळा दाबून खून केला. मृतदेह लोखंडी पेटीत भरला अन् सेफ्टी टँकमध्ये फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

नेमकं प्रकरण काय?

मृत महिलेचे नाव आश्रफी उर्फ सिया होते. ती मूळची महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याची होती. वर्षभरापूर्वी सियाची ओळख भोपाळच्या समीर नावाच्या व्यक्तीशी 'इन्स्टाग्राम'वर झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि समीरसोबत राहण्यासाठी सिया आपले घर सोडून तीन महिन्यांपूर्वी भोपाळला गेली होती. समीर हा रिक्षा चालक असून २ मुलांचा बाप असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झालेय.

समीर-सिया यांच्यात वाद का झाला ?

समीर हा आधीच विवाहित होता आणि त्याला दोन मुले होती. सिया त्याच्यासोबत राहू लागल्याने घरात रोज भांडणे होऊ लागली. सिया समीरकडे लग्नासाठी तगादा लावत होती. लग्नास नकार दिल्यास ५ लाख रुपयांची मागणी करत होती. या रोजच्या कटकटीला कंटाळून समीरच्या पत्नीने घर सोडले आणि ती माहेरी निघून गेली होती. त्यामुळे दोघांचा वाद आणखी वाढत गेला.

सियाचा काटा कसा काढला ?

सोमवारी संध्याकाळी सिया आणि समीरमध्ये जोरात भांडण झाले. रागाच्या भरात समीरने सियाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने आपल्या आई, भाऊ आणि बहिणीची मदत घेतली. त्यांनी सियाचा मृतदेह एका लोखंडी पेटीत भरला, त्यात जड दगड टाकले आणि रात्रीच्या अंधारात घराशेजारील एका रिकाम्या प्लॉटमधील सेप्टिक टॅंकमध्ये फेकून दिले.

पितळं उघड कसं पडले ?

गुरुवारी संध्याकाळच्या वेळी रिकाम्या प्लॉटमध्ये लहान मुले खेळत होती. त्या लहान मुलांना भयंकर दुर्गंधी येत असल्याचे जाणवले. त्यांनी पाहिलं असता टाकीत एक पेटी तरंगताना दिसली. मुलांनी तात्काळ पालकांना कळवले. गांभीर्य पाहून रहिवाशांनी पोलिसांत याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी ती पेटी उघडली असता त्यात सियाचा कुजलेला मृतदेह आढळला.

मृतदेहाची अवस्था अतिशय खराब होती. कुजलेला मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोर आव्हान होते. पण सियाच्या हातावर असलेल्या 'दिव्या'च्या टॅटूवरून आणि त्यावर लिहिलेल्या जन्म रखेवरून पोलिसांनी ओळख पटवली. पोलिसांनी समीरचा भाऊ, आई आणि बहिणीला अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी समीर याला पोलिसांनी दोन दिवसानंतर बेड्या ठोकल्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT