Indore Water Contaminated 15 Death News Saam Tv
देश विदेश

Indore Water : देशात खळबळ! दूषित पाण्याने १५ जणांचा बळी घेतला, शेकडो लोक ICU मध्ये

Indore Water Contaminated 15 Death News : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये गटाराच्या पाईप लाईनची गळती होऊन अस्वच्छ पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळल्याने स्थानिक नागरिकांना आजारांना सामोरे जावे लागले. यामध्ये १५ जणांचा नाहक बळी गेला असून आणखी ३२ जण अद्यापही ICUमध्ये उपचार घेत आहेत.

Alisha Khedekar

  • इंदूरमधील दूषित पाणी प्रकरणात १५ मृत्यू आणि रुग्णांचा आकडा १४०० वर

  • भगीरथपुरा भागात गटार गळतीमुळे स्वच्छ पाणी प्रदूषित

  • पिण्याच्या पाण्यामुळे अतिसाराचा प्रादुर्भाव, 32 रुग्ण ICU मध्ये

  • महापालिका आयुक्तांना नोटीस, अधिकारी निलंबित

मध्य प्रदेशातील इंदूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. दूषित पाणी प्यायल्यामुळे १५ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत अनेक जण अद्याप गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. संबंधित वसाहतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत होता. शुद्ध पाणी समजून रहिवाशांनी ते प्राशन केले आणि ही मोठी दुर्घटना घडली. या घटनेने पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २९ डिसेंबर रोजी इंदूरच्या भगीरथपुरा येथील रहिवाशी अचानक आजारी पडू लागले. सुरुवातीला त्रास होणाऱ्या काही जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हळूहळू हा आकडा वाढतच गेला. दरम्यान याचा तपास केला असता अतिसाराची लागण झाल्याचं समोर आलं. रुग्णांना झालेली ही अतिसाराची लागण पिण्याच्या दूषित पाण्यामुळेच झाल्याचे प्रयोगशाळेतील तपासणीमध्ये सिद्ध झाले आहे.

इंदूरचे मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉ. माधव प्रसाद हसनी यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘भगीरथपुरा भागात एका गटाराच्या वाहिनीतून गळती झाल्याने पिण्याचे पाणी दूषित झाले आहे. तेथूनच या साथीचा प्रादुर्भाव झाला.’ या दूषित पाण्याने आतापर्यंत १५ जणांचा निष्पाप बळी गेला असून अद्यापही ३२ नागरिक आयसीयूमध्ये दाखल आहेत. तर २०० नागरिकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आजाराची लग्न झालेल्या नागरिकांचा एकूण आकडा १४०० वर गेला आहे.

दरम्यान १५ बळी गेल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. इंदूर महापालिकेचे आयुक्त दिलीपकुमार यादव यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त रोहन सिसोनिया यांची बदली करण्यात आली असून, पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदीप निगम यांना निलंबित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांनी राज्यातील सर्व १६ महापालिकांचे महापौर, आयुक्त, जिल्हाधिकारी यांची तातडीने बैठक बोलावली. इंदूरमधील दूषित पाणीपुरवठ्यासाठी दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी प्रशासन सज्ज

Famous Actress : मौनी रॉयनंतर आणखी एका अभिनेत्रीसोबत Live शोमध्ये गैरवर्तन; गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Gadchiroli Tourism : तुम्हाला किल्ल्यावर भटकंती करायला आवडते? मग गडचिरोलीमधील 'हे' ठिकाण फिरायला अजिबात विसरू नका

Indian Oil Job: परीक्षा नाही थेट नोकरी; इंडियन ऑइलमध्ये ३९४ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Shocking: मुंबईत स्पीकर अंगावर पडून चिमुकलीचा मृत्यू, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान भयंकर घडलं; थरारक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT