Viral VIdeo Saam TV
देश विदेश

Viral Video : बेडवर झोपलेल्या रुग्णाला डॉक्टरची शिवीगाळ करत मारहाण, कारणही तितकच धक्कादायक

Doctor Beat Patient in Hospitial : मारहाण करणाऱ्या ज्युनियर डॉक्टर आकाश कौशलला निलंबित करण्यात आले आहे.

प्रविण वाकचौरे

Indore Doctor Beat Patient Video :

इंदूरमध्ये राज्यातील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णाला एका डॉक्टरने मारहाण केल्याची घटना समोर आहे. रुग्ण उपचारासाठी बेडवर झोपलेला असताना डॉक्टरने ही मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाने डॉक्टरला निलंबित केले आहे.

रुग्णालयात उपचारासाठी आलेला रुग्ण HIV बाधित असल्याने डॉक्टरने मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्ण अॅडमिट झाल्यानंतर एचआयव्ही प्रोटोकॉल न पाळता डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. काही वेळानंतर रुग्णाने आपण एचआयव्ही बाधित असल्याचं सांगितलं. मात्र ही माहिती डॉक्टरांना नंतर कळाल्याने त्यांचा पारा चढला. (Latest Marathi News)

संतप्त डॉक्टरने स्ट्रेचरवर पडलेल्या रुग्णाला तिथेच दोन-तीन चापट मारल्या. हॉस्पिटलमध्ये रुग्णाला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. तत्काळ चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून मारहाण करणाऱ्या ज्युनियर डॉक्टर आकाश कौशलला निलंबित करण्यात आले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शुक्रवारी रात्री ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. संबधित रुग्णाला अपघातानंतर उपचारासाठी इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तात्काळ त्याच्यावर उपचार करून ड्रेसिंग करण्यास सुरुवात केली. मात्र सामान्य रुग्ण समजत डॉक्टरांनी त्याल हाताळले. मात्र डॉक्टरांना जेव्हा समजले की रुग्ण एचआयव्ही बाधित आहे, यानंतर ज्युनियर डॉक्टर आकाश कौशलला राग अनावर झाला.

डॉक्टरने एका हाताने रुग्णाचा मारहाण करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. जवळच उभ्या असलेल्या दुसर्‍या डॉक्टरने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने रुग्णाला मारहाण करणे सुरूच ठेवले. रुग्णालय प्रशासनाने याप्रकरणी चौकशी समिती स्थापन केली आहे. तर मारहाण करणाऱ्या ज्युनियर डॉक्टर आकाश कौशलला निलंबित करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT