Needleless ZYCOV-D Covid Vaccine launched in Patna Twitter/@ANI
देश विदेश

Needleless Vaccine: लस घ्यायचीय, पण इंजेक्शनची भिती वाटते? आता सुई न टोचता लस घ्या!

Needleless ZyCov-D Vaccine: बिहारची राजधानी पटना येथे आजपासून देशातील पहिली नीडललेस कोरोना लस (Needleless Corona Vaccine) द्यायला सुरुवात झाली आहे.

साम टिव्ही

पटना: तुम्हालाही कोरोना लस घ्यायचीय, पण तुम्हाला इंजेक्शनची भिती वाटते का? तर ही बातमी तुमच्यासाठी दिलासादायक ठरणारी आहे. कारण आता कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी तुम्हाला इंजेक्शन (Injection) घ्यावं लागणार नाही आणि सुईचा (Needle) सामनाही करावा लागणार नाही. कारण आजपासून भारतात नीडललेस (Needleless) म्हणजेज सुई नसलेली लस देण्यास सुरुवात झालीये. होय आता कोरोना लस (Corona Vaccine) घेण्यासाठी सुईच्या त्रासाला सामोरं जावं लागणार नाही.

झायडस कॅडिलाची (Zydus Cadila) कोरोना लस झायकोव्ह-डी (ZYCOV-D Covid Vaccine) डीएनए आधारित कोविड लस आहे. ही लस देताना इंजेक्शन सुईचा वापर न करता जेट इंजेक्टरसारख्या (Jet injector) अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, ज्यामुळे बिलकुल त्रास होत नाही किंवा वेदना होत नाही. बिहारची राजधानी पटना (Patna) येथे आजपासून देशातील पहिली नीडललेस कोरोना लस (Needleless Corona Vaccine) द्यायला सुरुवात झाली आहे. (Painless and Needleless ZYCOV-D Covid Vaccine launched in Patna)

हे देखील पहा -

याबाबत सिव्हिल सर्जन डॉ. विभा सिंह म्हणाल्या की, “ही लस 3 लसीकरण केंद्रांवर सुरू झाली आहे. या लसीचे एकुण तीन डोस दिले जातील जे 28 आणि 56 दिवसांच्या अंतराने दिले जातील. जे लोक सुई (इंजेक्शनला) घाबरतात त्यांच्यासाठी हे चांगले आहे." झायडस कॅडिलाची कोरोना लस झायकोव्ह-डी डीएनए (DNA) आधारित कोविड लस आहे. या लसीच्या आप्तकालीन वापरासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ही जगातील पहिली डीएनए-आधारित लस (world's first dna based covid vaccine) आहे. ही लस तीन डोसची लस आहे, दिवस 0, दिवस 28 आणि दिवस 56 अशाप्रकारी ती दिली जाते.

काही दिवसांपूर्वी भारताच्या औषध नियंत्रकाने झायडस कॅडिलाच्या स्वदेशी विकसित नीडल-फ्री कोविड-19 लस, ZyCoV-D च्या आपत्कालीन वापरामध्ये 12 ते 18 वयोगटातील लोकांना देण्यास मान्यता दिली होती. ZyCoV-D ही लस दोन ते चार अंश सेल्सिअस तापमानात ठेवता येईल आणि त्यासाठी कोल्ड चेनची आवश्यकता नसेल. यामुळेच या लसीचे डोस सहजपणे देशाच्या कुठल्याही भागात जाऊ शकतात. राज्यात या लशीसाठी नाशिक (Nashik) आणि जळगाव (Jalgaon) जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dream Astrology: स्वप्नात साप दिसल्यास शुभ की अशुभ?

Child Flight Rules: विमानात किती वर्षांपर्यंत लहान मुले मोफत प्रवास करू शकतात? जाणून घ्या एअरलाईनचे नियम

Maharashtra Live News Update: मालेगावातल्या भिक्खू चौकात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Vastu For Home: नवीन घर बांधताना 'या' ८ वास्तु नियमांचं पालन करायलाच हवं!

Nashik : वृद्ध ननंद भावजायचे धाडस; मंगळसूत्र तोडून पळणाऱ्यावर टाकली झडप, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT