तेजस कोसळण्यामागे घातपाताचं कारण आहे का?
तेजस MK1 लढाऊ विमान हवेतून हवेत आणि हवेतून जमीनीवर मारा करण्यास सक्षम
भारतीय हवाई दलाकडे 141 तेजस एमके 1 विमान आहेत.
दुबईतील एअर शोच्या शेवटच्या दिवशी जगात खळबळ माजली ती भारताचं तेजस MK1 हे लढाऊ विमान कोसळल्यानं. कारण तेजस हे लढाऊ विमान भारतीय बनावटीचं आहे. मात्र हवाई कसरतीदरम्यान अचानक तेजसनं घिरटी घेतली आणि जमीनीवर कोसळलं. आणि आगीचे भीषण लोट उसळले. मात्र तेजस कोसळण्यामागे घातपाताचं कारण आहे का? अशीही शंका उपस्थित केली जातेय.
खरंतर भारतीय हवाई दलाकडे 141 तेजस एमके 1 विमान आहेत. या लढाऊ विमानाचा हवाई दलात समावेश केल्यानं आत्मनिर्भरतेचं कौतूक केलं जात होतं. मात्र तेजस विमानाची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत? पाहूयात.
तेजस विमान आत्मनिर्भर भारताचं प्रतिक आहे.
हे हलक्या वजनाचं मल्टीरोल विमान आहे.
हवेतून हवेत आणि हवेतून जमीनीवर मारा करण्याची क्षमता.
विमानाचा वेग 2 हजार 222 किमी प्रति तास आणि 50 हजार फुटांवरुन उड्डाणाची क्षमता.
डेल्टा विंगमुळे हायस्पीड आणि चपळता दाखवण्यास मदत करतं.
'क्वाड्रप्लेक्स डिजिटल फ्लाईट कंट्रोल' ही हवेत विमानाला स्थिर करणारी यंत्रणा.
शत्रूच्या रडार सिस्टीमला जॅम करु शकणारी यंत्रणा.
हवेतच इंधन भरण्याची क्षमता.
.रशियन बनावटीच्या क्षेपणास्त्रांनी सज्ज.
तेजस या स्वदेशी विमानाची बांधणी इतकी मजबूत असताना हे विमान कोसळलंय. त्यामुळे आत्मनिर्भर भारताला मोठा धक्का मानला जातोय. त्यामुळे विमानाच्या ब्लॅक बॉक्स, कॉकपीट डेटा रेकॉर्डर एवढंच नाही तर विमानाच्या अवशेषांचं विश्लेषण करुन त्यामागे काही घातपात तर नाही ना. याचा तपास करण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.