2700 crore investment for 27 new Vande Bharat trains saam tv
देश विदेश

1000 वंदे भारत, 35000 कोटींचं बजेट, यावर्षी २७ नव्या वंदे भारत ट्रॅकवर धावणार, रेल्वेचा मेगाप्लान

2700 Crore Investment For 27 New Vande Bharat Trains: भारतीय रेल्वे यंदा २७ नव्या वंदे भारत ट्रेन तयार करण्याच्या तयारीत आहे. यासाठी सुमारे २७०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, देशात १००० वंदे भारत ट्रेनचा मेगा प्लॅनही आखण्यात आला आहे.

Omkar Sonawane

भारत सरकार रेल्वे प्रवासाचा पूर्णपणे कायापालट करण्याचे दिशेने वेगाने पाऊल उचलत आहे. प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा आणि वंदे भारत रेल्वेच्या संख्या वाढवण्यासाठी चालू वर्षात 2700 कोटी रुपयांहून अधिक खर्च करणार असून तब्बल 27 नव्या सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेन तयार करणार आहेत. देशातील तीन प्रमुख कारखान्यांमध्ये या ट्रेनच्या निर्मितीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

सध्या देशभरात चेअरकार आणि स्लीपर मिळून 100 हून अधिक वंदे भारत ट्रेन ही रुळावर धावत आहेत. मात्र, यंदाचे हे वर्ष वंदे भारत ट्रेन उत्पादनाच्या दृष्टीने सर्वात मोठे वर्ष ठरण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या आर्थिक वर्षात 27 नवीन ट्रेन उत्पादन करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रवाशांची मागणी आणि गरज लक्षात घेता ही संख्या आणखी वाढू शकते, चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी, रायबरेतील मॉडर्न कोच फॅक्टरी आणि कपूरथळा रेल कोच फॅक्टरी या ठिकाणी या ट्रेनच्या निर्मितीचे काम सुरू आहे.

1000 वंदे भारत ट्रेनचा मेगा प्लॅन

भारतीय रेल्वेने भविष्याचा विचार करून 1000 वंदे भारत ट्रेन तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 8,16 आणि 24 डब्यांचे विविध ट्रेन सेट तयार केले जाणार आहेत. यामध्ये चेअरकार आणि स्लीपर अशा दोन्ही प्रकारच्या ट्रेनचा समावेश असेल. या प्रकल्पासाठी 35 हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मागणी आणि गरजेनुसार ट्रेन देशातील विविध मार्गांवर सुरू केल्या जाणार आहेत.

वंदे भारतनंतर भारतीय रेल्वे आता आणखी वेगवान ट्रेनच्या दिशेने वाटचाल करत आहे. ICF चेन्नई आणि BEML यांच्या सहकार्याने ताशी 280 किलोमीटर वेगाने धावणारी स्वदेशी हायस्पीड ट्रेन विकसित केली जात आहे. ही स्वदेशी हायस्पीड ट्रेन देशात विकसित होत असलेल्या मुंबई-अहमदाबाद हायस्पीड ट्रेन बुलेट ट्रेनच्या मार्गावर धावण्याची शक्यता आहे. LHB ट्रेन सेटची किंमत सुमारे 80 कोटी रुपये वंदे भारत किंमत 100 कोटी रुपायांपेक्षा जास्त असणार आहे. त्यानुसार 27 वंदे भारत ट्रेनच्या निर्मितीसाठी सुमारे 2700 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

भारतीय रेल्वेच्या या विस्तारामुळे देशातील सेमी-हायस्पीड रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरणार असून, भविष्यात प्रवाशांना अधिक वेगवान, आधुनिक आणि आरामदायी रेल्वे प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care: वजन कमी करण्यासाठी सकाळची सुरुवात करा 'या' पाण्याने; शरीराला मिळतील ‘हे’ ७ आरोग्यदायी फायदे

रात्री कोमट पाण्यात 'हा' एक पदार्थ मिक्स करून प्या अन् चमत्कार पाहा

7/12 Utara: सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा, फडणवीस सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

Maharashtra News Live Update : Kolhapur: अंबाबाई भक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक

Tobacco Ban : तंबाखू, निकोटिनयुक्त गुटखा, पानमसाल्यावर थेट बंदी; या राज्य सरकारचा निर्णय, विक्रेत्यांवरही मोठी कारवाई होणार

SCROLL FOR NEXT