"Indian Railways Fare Hike From July 1: AC & Long-Distance Travel to Cost More" Saam TV News Marathi
देश विदेश

रेल्वेचे तिकीट दर वाढले, १ जुलैपासून प्रवास महागणार, कशी असेल नवी भाडेवाढ?

AC non-AC ticket charges revised : १ जुलै २०२५ पासून भारतीय रेल्वेने ५०० किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी भाडेवाढ लागू केली आहे. एसी साठी २ पैसे आणि नॉन एसी साठी १ पैसा प्रति किमी दरवाढ. लोकल ट्रेनच्या दरात कोणताही बदल नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Train ticket price increase July : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला आता चाप बसणार आहे. कारण भारतीय रेल्वेने एक जुलै 2025 पासून तिकिटांच्या किंमतीत वाढ केली आहे. सर्व सामान्य प्रवाशांसोबतच (जनरल) एसीने प्रवास करणाऱ्यांना तिकिटासाठी आता अतिरिक्त पैसे द्यावे लागणार आहे. दिलासादायक म्हणजे, हा बदल फक्त ५०० किमीपेक्षा जास्त अंतरासाठी असेल. त्याशिवाय काही श्रेणींसाठी भाडेवाढ करण्यात आलेली नाही.

रेल्वेच्या नव्या तिकिट दरानुसार, सेकंड क्लासच्या (Second Class) तिकिटासाठी ५०० किमीपर्यंतच्या प्रवासासाठी कोणताही वाढ झालेली नाही. पण हा प्रवास ५०० किमीपेक्षा जास्त असेल तर प्रति किमी अर्धा पैसा जास्त तिकिट द्यावे लागले. त्याशिवाय मेल, एक्सप्रेस ट्रेनमधील नॉन एसी प्रवाशांना प्रति किमोमीटर एक पैसा जास्त द्यावा लागणार आहे. एसीच्या तिकिट दरांमध्ये प्रति किमी २ पैशांनी वाढ करण्यात आली आहे.

दिलासादायक म्हणजे, मुंबई लोकलसह इतर शहरी ट्रेनच्या तिकिटाच्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्याशिवाय मासिक पासच्या दरांमध्येही कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेल्वेने यापूर्वीही तिकीट बुकिंग नियमांमध्ये बदल केला आहे. यापूर्वी कन्फर्म तिकिटाचा चार्ट २४ तास आधीच जारी केला जाईल. याआधी तिकीट बुक केल्यास प्रवासाच्या चार तास आधी तिकिट कन्फर्म झाले की नाही समजत होते.

रेल्वेकडून नवीन तिकीट बुकिंगच्या प्रणालीची तयारी करण्यात येत आहे. याबाबतची चाचपणी करण्यात येत आहे. राजस्थानमध्ये 6 जूनपासून प्रायोगिक तत्वावर नव्या दरानुसार तिकिटांची विक्री केली जात आहे. सध्या फक्त एका ट्रेनपुरती मर्यादित हा प्रयोग सुरू आहे. आतापर्यंत यात कोणतीही अडचण आलेली नाही, असे रेल्वेच्या अधिकाऱ्याकडून सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wildcat: मांजर कोणत्या बाजूने आडवी गेली तर काय करावं?

Kitchen Hacks: पीठ मळून फ्रिजमध्ये रात्रभर ठेवल्याने शरीराला त्रास होतो का? जाणून घ्या सत्य

महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या रोखणार, सरकारचं मोठं पाऊल, टास्क फोर्स नेमकं काय करणार?

Maharashtra Live News Update : राज्यात आज शिवजंयतीचा उत्साह

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

SCROLL FOR NEXT