Indian Navy  Saam Digital
देश विदेश

Indian Navy : 3 महिने सोमालीयन चाच्यांच्या ताब्यात असलेल्या जहाजाची सुटका; ३५ सशस्त्र चाच्यांना घेललं ताब्यात, पहा भारतीय नौदलाचा थरारक Video

Indian Navy/INS Warship Kolkata Mission : अरबी समुद्रात पुन्हा एकदा भारतीय नौदलाने आपली ताकद दाखवून दिली आहे. सोमालीयन चाच्यांच्या पकडण्यासाठी ४० तासांची मोहीम राबवण्यात आली होती, त्यात नौदलला मोठं यश आलं आहे. ३५ मोलियन चाच्यांना नौदलाने पकडलं आहे.

Sandeep Gawade

Indian Navy

अरबी समुद्रात पुन्हा एकदा भारतीय नौदलाने आपली ताकद दाखवून दिली आहे. तब्बल तीन महिने सोमालीयन चाच्यांच्या ताब्यात असलेल्या जहाची सुटका करण्यात आली असून ३५ समुद्र चाच्यांना ताब्यात घेतलं आहे. आएनएस कोलकाता युद्धनौकेवरून ४० तासांची मोहीम नौदलाने राबवली होती, त्यात नौदलला मोठं यश आलं आहे. या मोहिमेत जहाजावरील १७ जणांचीही सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून एक मालवाहतूक जहाज या लुटारूंच्या ताब्यात होतं. दीर्घकाळ चाललेल्या या मोहिमेत समुद्री चाच्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पडलं. आयएनएस युद्धनौका मुंबईला पोहोचली असून ताब्यात घेतलेल्या चाच्यांविरोधात आयपीसी अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

एमव्ही रुएनचं गेल्या १४ डिसेंबर रोजी सोमालीयाच्या चाच्यांनी अपहरण केलं होतं. खोल समुद्रात होणारी टुटमार रोखण्यासाठी हे जहाज निघालं होतं. आयएनएस कोलकाताने लॉन्च केलेल्या ड्रोनद्वारे एमव्ही रुएनवर सशस्त्र समुद्री चाच्यांच्या उपस्थितीचा सुगावा लागला होता. यावेळी चाच्यांनी ड्रोन खाली पाडलं होतं भारतीय नौदलाच्या जहाजावर गोळीबार केला. INS कोलकाता ने जहाजाची सुकाणू प्रणाली आणि नेव्हिगेशनल एड्स निष्क्रीय केली, ज्यामुळे समुद्री चाच्यांना जहाज थांबवण्यास भाग पडलं. भारतीय समुद्र किनाऱ्यापासून २६०० सागरी मैलावर या जहाजाला रोखण्यात आलं. या जहाजावरून दारूगोळा आणि शस्त्रे आणि बंदी असलेलं साहित्य जप्त करण्यात आलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

INS कोलकाता हे भारतीय नौदलाच्या कोलकाता-श्रेणीच्या स्टेल्थ गाईडेड-क्षेपणास्त्र विनाशिकेतील प्रमुख जहाज आहे. ज विनाशिकेची बांधणी Mazagon Dock Limited (MDL) मध्ये करण्यात आली आहे. 10 जुलै 2014 रोजी सागरी चाचण्या पूर्ण झाल्यानंतर नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली होती. 16 ऑगस्ट 2014 रोजी आयोजित समारंभात पंतप्रधानांच्या हस्ते हे जहाज अधिकृतपणे कार्यान्वित करण्यात आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sachin Tendulkar Son : सचिनचा मुलगा अर्जुनचा साखरपुडा झाला; कोण आहे तेंडुलकर घराण्याची होणारी सून?

Bank Charges: महत्त्वाची बातमी; आता बँक व्यवहारांवर आकारणार शुल्क, कधीपासून लागू होणार नियम?

Mumbai High Court: कबुतरखान्यावरून मराठीविरुद्ध जैन; हायकोर्टाकडून बंदी कायम

Adult Video: शाळेत वर्ग सुरू असतानाच एलईडी स्क्रीनवर लागला पॉर्न; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Hair Care Tips: आठवड्यातून केसांना कितीवेळा तेल लावावे?

SCROLL FOR NEXT