Russia Ukraine War
Russia Ukraine War Saam Tv
देश विदेश

Russia Ukraine War : भारतीय डॉक्टरचा युक्रेन न सोडण्याचा निर्णय; हे आहे कारण

साम वृत्तसंथा

रशिया(Russia)-युक्रेन युध्दात अनेक भारतीय विद्यार्थी अडकलेतं. या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. अनेक विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. पण अजूनही विद्यार्थी अडकले आहे. युक्रेनमधील कीव, खार्किव या शहरांवर रशियाने हल्ले केले आहेत.

याच शहरात भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. आता एक वेगळीच माहिती समोर येत आहे. कोलकाता येथील एक डॉक्टर युक्रेनमध्ये अडकलेतं. ते भारतात येणार नसल्याचे सांगत आहेत. ते अडकले नसून थांबलो असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते युक्रेनमध्ये (Ukraine) मेडिकल कॉलेज मध्ये शिक्षक आहेत. त्यांनी युक्रेन सोडण्यास नकार दिला आहे.

कोलकाता (Kolkata) येथील रहिवासी 37 वर्षीय डॉ. पृथ्वीराज घोष यांनी युक्रेन न सोडण्याचा निर्णय घेतलायं. तर तिथेच राहून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी मदत करणार असल्याचं त्यांनी ठरवलं आहे. मी कीव मध्ये अडकलेलो नाही, मी माझ्या मर्जीने येथे थांबलो आहे. मी 350 विद्यार्थ्यांना युक्रेन मधून बाहेर काढण्यास मदत केली आहे. ते माझे विद्यार्थी आहेत. अजुनही अडकलेल्या विद्यार्थ्यांना मी बाहेर काढण्यासाठी मदत करणार असल्याचे घोष यांनी म्हटले आहे.

सुमीमध्ये अजुनही 700 विद्यार्थी अडकले

सुमीमध्ये सध्या सुमारे 700 विद्यार्थी अडकलेतं. दररोज त्यांना बॅगसह तयार राहण्यास सांगितले जाते पण अजुनही त्यांना बाहेर काढलेलं नाही. आता सुमी मध्ये लाईट नाही पाणीही नाही. पाण्यासाठी बादल्यांमध्ये बाहेरून बर्फ गोळा करत आहेत.

Edited by- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Broccoli for Weightloss: ब्रोकोलीमध्ये 'या' आरोग्यदायी गुणधर्मांचा खजिना

Gondia News : गोंदियाच्या मुख्य जलाशयात १९ टक्के जलसाठा; पाणी टंचाईचे संकट उभे

SRH vs GT: गुजरातच्या विजयासाठी RCB अन् CSK चे देव पाण्यात! कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड?

Loksabha Election 2024: लोकसभेचे नादखुळा उमेदवार! चक्क तिरडीवर बसून अर्ज भरायला पोहोचले, स्मभानभुमीत 'प्रचार' कार्यालय थाटले

Eknath Shinde Bag | Bharat Gogawale यांची मोठी प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT